हुंड्यासाठी पतीने दिले सिगारेटचे चटके! सुखवस्तू आणण्यासाठी तगादा

By अनिल गवई | Published: October 17, 2023 10:18 PM2023-10-17T22:18:11+5:302023-10-17T22:18:21+5:30

या तक्रारीवरून शहर पोलीसांनी सासरच्या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला.

Husband gave cigarettes for dowry! Tagada to bring comforts | हुंड्यासाठी पतीने दिले सिगारेटचे चटके! सुखवस्तू आणण्यासाठी तगादा

हुंड्यासाठी पतीने दिले सिगारेटचे चटके! सुखवस्तू आणण्यासाठी तगादा

खामगाव: माहेरहून पैसे आणण्यासाठी शहरातील एका विवाहितेचा अन्ववित छळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पतीने सिगारेटचे चटके दिले तर सासरच्यांनी कार घेण्यासाठी मारहाण केल्याची तक्रार विवाहितेने केली. या तक्रारीवरून शहर पोलीसांनी सासरच्या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला.

याबाबत आंकाशा निलेश भारद्वाज ३० या विवाहितेने शहर पोलीसांत दिलेल्या तक्रारीनुसार तिचे लग्न निलेश अमोल भारद्वाज ३३ याच्याशी झाले. सुरूवातीचे काही दिवस सासरच्यांनी चांगली वागणूक दिली. मात्र, नंतर तिचा नागपूर आणि कात्रज पुणे येथे अन्ववित छळ करण्यात आला. दारूड्या पतीने सिगारेटचे चटके देऊन तर उर्वरीत आरोपींनी माहेरहून घरातील वस्तू आणि कार घेण्यासाठी तगादा लावला. हुंड्यासाठी मारझोड करून मानसिक त्रास दिल्याचा आरोप तक्रारीत केला. 

या तक्रारीवरून शहर पोलीसांनी पती निलेश अमोल भारद्वाज, सासरा अमोल भाऊराव भारद्वाज, सासू अनुपमा अमोल भारद्वाज, दीर ऋषिकेश अमोल भारद्वाज सर्व रा. प्लॉट नं. ९४, एकदंत अपार्टमेंट, शिल्पा सोसायटी २, शनीधाम जवळ, नरेंद्र नगर, नागपूर यांच्या  विरोधात मंगळवारी रात्री भादंवि कलम ४९८ (अ), ३२३, ५०४, ५०६, ३४ सहकलम ३, ४, हुंडाबळी अधिनियम १९६१ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोहेकॉ गजानन पाटील करीत आहेत.

Web Title: Husband gave cigarettes for dowry! Tagada to bring comforts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.