भयंकर! बायकोची हत्या करण्याच्या नादात नवऱ्यानेच गमावला जीव; 6 लाखांची सुपारी दिली पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 01:07 PM2023-12-01T13:07:20+5:302023-12-01T13:12:12+5:30

तेजपालची हत्या सुपारी किलरने केल्याचं पोलिसांनी सांगितलं. पकडलेल्या शूटर बलराजला तेजपाल याने पत्नीच्या हत्येसाठी 6 लाख 20 हजार रुपयांची सुपारी दिली होती.

husband gave money to shooters for wife murder but criminals killed him bulandshahr sensational revelation | भयंकर! बायकोची हत्या करण्याच्या नादात नवऱ्यानेच गमावला जीव; 6 लाखांची सुपारी दिली पण...

फोटो - आजतक

उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये पतीने पत्नीच्या हत्येसाठी 6 लाख रुपयांची सुपारी दिली. शूटर्स पत्नीला मारू शकले नाहीत. याच दरम्यान, त्यांनी सुपारीचे पैसे परत करावे लागू नयेत म्हणून पतीची हत्या करण्याचा विचार केला आणि संधी साधून शूटर्सनी पतीला गोळ्या घालून ठार केलं. या हत्या प्रकरणात पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. 

बुलंदशहरच्या ककोड पोलीस स्टेशन परिसरातील हे संपूर्ण प्रकरण आहे. जिथे 15 नोव्हेंबर रोजी प्रॉपर्टी डीलर तेजपाल यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येचे गूढ उकलण्यात पोलीस बराच काळ व्यस्त होते. दरम्यान, तेजपाल यांच्यावर गोळ्या झाडणारे शूटर्स पकडले गेले. त्याच्याकडे चौकशी केली असता या हत्या प्रकरणाचा धक्कादायक खुलासा समोर आला.

तेजपालची हत्या सुपारी किलरने केल्याचं पोलिसांनी सांगितलं. पकडलेल्या शूटर बलराजला तेजपाल याने पत्नीच्या हत्येसाठी 6 लाख 20 हजार रुपयांची सुपारी दिली होती. कारण, तेजपालला संशय होता की, पत्नीला त्याची हत्या करायची होती. पण शूटर बलराज आणि त्याचा सहकारी दीप सिंह तेजपालच्या पत्नीला मारण्यात यशस्वी झाले नाहीत. ती सीसीटीव्हीच्या निगराणीखाली राहत होती.

अशा स्थितीत सुपारीसाठी मिळालेले पैसे परत करावे लागू नयेत म्हणून त्यांनी तेजपाललाच मार्गातून हटवण्याची योजना आखली. 15 नोव्हेंबर रोजी बलराज आणि दीप यांनी तेजपालच्या पत्नीची हत्या करण्याऐवजी तेजपालची गोळ्या झाडून हत्या केली. सध्या पोलिसांनी बलराज आणि दीपला अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन लाख रुपये, एक पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बलराज आणि दीप यांनी चौकशीदरम्यान सांगितले की, प्रॉपर्टी डीलर तेजपालला पत्नी त्याची हत्या करेल असा संशय होता, त्यामुळे तेजपालने आपल्या पत्नीच्या हत्येचा कट रचला आणि त्याच्या हत्येसाठी 6 लाख रुपयांची सुपारी दिली. पण तेजपालची पत्नी जिथे राहत होती तिथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. पकडले जाण्याच्या भीतीने बलराज आणि दीप तेजपालच्या पत्नीला मारू शकले नाहीत. अशा स्थितीत तेजपाल यांना सुपारीचे पैसे परत करावे लागले नाहीत, त्यामुळेच त्यांनी तेजपालची गोळ्या झाडून हत्या केली.
 

Web Title: husband gave money to shooters for wife murder but criminals killed him bulandshahr sensational revelation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.