पत्नीसोबत वाद झाल्यावर पतीने 30 मित्रांना दिला तिचा फोन नंबर, त्यानंतर असं काही घडलं की...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 11:02 AM2022-09-08T11:02:50+5:302022-09-08T11:03:31+5:30

Crime News : मंगळवारी पीडित महिलेने पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. यानंतर पोलीस आयुक्तांनी कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

husband give wife mobile whatsapp number to 30 friends in kanpur | पत्नीसोबत वाद झाल्यावर पतीने 30 मित्रांना दिला तिचा फोन नंबर, त्यानंतर असं काही घडलं की...

पत्नीसोबत वाद झाल्यावर पतीने 30 मित्रांना दिला तिचा फोन नंबर, त्यानंतर असं काही घडलं की...

googlenewsNext

कानपूर : पती-पत्नीच्या भांडणाची धक्कादायक घटना कानपूरमधून समोर आली आहे. याठिकाणी पत्नीने हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा पतीविरोधात दाखल केला. त्यामुळे पतीने बदला घेण्यासाठी असा प्रकार शोधून काढला, की सर्वांनाच आश्चर्य धक्का बसला. दरम्यान, एका महिलेने आरोप आहे की, तिच्या पतीने पोलिसांत दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव आणला आणि तिचा फोन नंबर आपल्या 30 मित्रांना दिला व त्यांना अश्लील मेसेज पाठवण्यास सांगितले. 

मंगळवारी पीडित महिलेने पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. यानंतर पोलीस आयुक्तांनी कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हे प्रकरण चकेरी भागातील असून, येथे राहणाऱ्या आकाशचे 2019 मध्ये श्याम नगर येथील एका महिलेशी लग्न झाले होते. लग्नाच्या 2 वर्षानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला, आकाशच्या कुटुंबीयांनी खोटे बोलून लग्न केल्याचा पत्नीचा आरोप आहे. आकाश नोकरी करत नव्हता, यावरून दोघांमध्ये वाद झाला. 

लग्नात तिच्या आई-वडिलांनी 15 लाख रुपये खर्च केले होते, असे महिलेने म्हटले आहे. तसेच, महिलेचा आरोप आहे की 2021 मध्ये तिला मारहाण करून घराबाहेर काढण्यात आले, त्यानंतर तडजोडीचे अनेक प्रयत्न करण्यात आले. तरीही तडजोड झाली नाही. त्यानंतर 2022 मध्ये आकाश आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध हुंडा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर आकाश इतका संतापला की, पत्नीची बदनामी करण्यासाठी त्याने तिचा फोन नंबर 30 मित्रांना दिला. यानंतर तिला अश्लील मेसेज, फोटो आणि व्हिडिओ मिळू लागले. पीडित महिलेचे म्हणणे आहे की, तिने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार केली, पण पोलिसांनी ती गांभीर्याने घेतली नाही. त्यामुळे तिला आपली तक्रार घेऊन आयुक्तांकडे जावे लागले. दरम्यान, महिला कक्षाच्या एसीपींना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पीडित महिलेचे म्हणणे आहे की, तिने तिचा पती आकाश आणि तिच्या पतीविरुद्ध हुंडा कायद्यांतर्गत एफआयआर दाखल केला आहे. तिची बदनामी करण्यासाठी पतीने तिचा फोन नंबर मित्रांना दिला. त्यानंतर त्याच्याकडे घाणेरडे मेसेज आणि व्हिडिओ येऊ लागले. मी थकले आहे, आता जगणे कठीण झाले आहे, त्यामुळे मला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस आयुक्तांकडे यावे लागले, असे पीडित महिलेने म्हटले आहे. 

Web Title: husband give wife mobile whatsapp number to 30 friends in kanpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.