पतीला इन्स्टाग्रामवर समजलं पत्नीने केलं दुसरं लग्न, फोनवर जे बोलली त्यावर विश्वास बसणार नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 11:07 AM2022-08-24T11:07:47+5:302022-08-24T11:08:13+5:30
Crime News : काशिमपूरमध्ये राहणारा नवरदेव तरूण याने त्याची नवरी आणि तिच्या दुसऱ्या पतीविरोधात पोलिसात फसवणुकीची तक्रार दाखल केली.
UP Crime News : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधून प्रेम, लग्न आणि दग्याची एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एक नवरी दागिने आणि काही रोख रक्कम घेऊन पळाली. पीडित तरूणाने पोलिसात त्यानंतर तक्रार दाखल केली. पीडित तरूणानुसार, तरूणीने आधी त्याला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. नंतर त्याच्यासोबत लग्न केलं. काही दिवसांनी ती दागिने आणि रोख रक्कम घेऊन फरार झाली. ती तिच्या माहेर गेली.
काशिमपूरमध्ये राहणारा नवरदेव तरूण याने त्याची नवरी आणि तिच्या दुसऱ्या पतीविरोधात पोलिसात फसवणुकीची तक्रार दाखल केली. पीडित तरूणाने सांगितलं की, त्याला इन्स्टाग्रामवरून समजलं की, त्याच्या पत्नीने दुसरं लग्न केलं.
याप्रकरणी एसएचओ विनय कुमार सिंग यांनी सांगितलं की, पीडित अमित यादव राजस्थानच्या कोटामध्ये इंजिनिअरींगचं शिक्षण घेत होता. तिथे त्याची भेट निशा नावाच्या तरूणीसोबत झाली होती. जी हरयाणाची राहणारी होती. दोघांमध्ये आधी मैत्री झाली. मग ते जवळ आले. तरूणी त्याच्यामागे लग्नाचा तगादा लावत होती. जेव्हा अमितने लग्नास नकार दिला तेव्हा तिने कोटाच्या एका पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर दोघांना आर्य समाज मंदिरात लग्न करावं लागलं.
त्यानंतर लग्न लखनौमध्ये रजिस्टर करण्यात आलं. सासरच्या लोकांकडून नवरीला सोन्याचे दागिने आणि 40 हजार रूपये मिळाले. काही दिवसांनंतर तरूणी कारण सांगत तिच्या माहेरी हरयाणामध्ये गेली आणि तिने सासरी परत येण्यास नकार दिला. यादरम्यान तिला खूप समजावण्यात आलं. काही दिवसांनंतर अमित यावदने इन्स्टाग्राम उघडलं तेव्हा त्याला समजलं की, पत्नीने गौतम अहीर नावाच्या तरूणासोबत दुसरं लग्न केलं.
फोटो पाहिल्यानंतर अमितने लगेच आपल्या पत्नीला फोन केला आणि याबाबत तिला विचारलं तेव्हा तिने सांगितलं की, तिचा पती सरकारी नोकरी करतो तसेच दिसायलाही स्मार्ट आहे त्यामुळे ती त्याच्यासोबत राहणार. जर घटस्फोट हवा असेल तर 5 लाख रूपये द्यावे. यानंतर पीडित तरूणाने पत्नीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली की, विवाहित असूनही तिने दुसरं लग्न केलं. पुढील कारवाई सुरू आहे.