धन्य ती महिला आणि तिचा बॉयफ्रेंड! होमगार्ड ड्युटीवर, पत्नी दोन मुलांना घरीच ठेऊन फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 01:41 PM2023-04-16T13:41:49+5:302023-04-16T13:42:09+5:30

मिळालेल्या माहितीनुसार ही महिला एका तरुणासोबत पळून गेली आहे. होमगार्ड जवान लाल बाबू यादव याची ती पत्नी आहे.

Husband home guard duty, wife absconds leaving two children at home with Boyfriend in Bihar | धन्य ती महिला आणि तिचा बॉयफ्रेंड! होमगार्ड ड्युटीवर, पत्नी दोन मुलांना घरीच ठेऊन फरार

धन्य ती महिला आणि तिचा बॉयफ्रेंड! होमगार्ड ड्युटीवर, पत्नी दोन मुलांना घरीच ठेऊन फरार

googlenewsNext

जेव्हा एखादा व्यक्ती प्रेमात आकंठ बुडतो ना तेव्हा तो कशाच्याच शुद्धीत राहत नाही. असाच प्रकार बिहारच्या जहानाबादमध्ये घडला आहे. ४ मुलांची आई असलेली महिला दोन मुलांना घरीच सोडून प्रियकरासोबत पळून गेली आहे. त्याहून धक्कादायक म्हणजे तिचा पती पोलिसात आहे. पुढे काय परिणाम होतील, याचा विचार ना तिने केला ना तिच्या धाडसी बॉयफ्रेंडने केला आहे. 

अशी कारणे, ज्यामुळे विवाहबाह्य संबंध अनेक वर्षे टिकतात... कितीही प्रेम असो,,...

मिळालेल्या माहितीनुसार ही महिला एका तरुणासोबत पळून गेली आहे. होमगार्ड जवान लाल बाबू यादव याची ती पत्नी आहे. रिंकू देवी १२ एप्रिलपासूनच घरातून बेपत्ता झाली आहे. २०१२ मध्ये त्यांचे लग्न झाले होते. ४ मुलेही झाली. सारे काही ठीक चालले होते. परंतू, गेल्या १० महिन्यांपासून एका तरुणासोबत तिचे फोनवर बोलणे वाढले होते. एकदा तिला त्याच्याशी बोलताना पकडले देखील होते. 

परंतू, लालबाबूने तिला ओरडून सोडून दिले होते. नेहमीप्रमाणे मी ड्युटीवर होतो. तेव्हा मला १३ तारखेला पत्नी घरातून गायब असल्याची माहिती मिळाली. मी ड्यूटी सोडून घरी आलो आणि तिचा सर्वत्र शोध घेतला. ती न मिळाल्याने १५ तारखेला मी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस आता चौकशी करत आहेत, असे लाल बाबू याने सांगितले. 

कटिहार येथून एक मेस्त्री लखावरमध्ये आरोग्य केंद्र उभारण्यासाठी आला होता. ते केंद्र लालबाबूच्या घराच्या बाजुलाच होते. लाल बाबू ड्युटीवर असल्याने व घरी येण्याचे काही नक्की नसल्याने पत्नीचे त्या मेस्त्रीसोबत सूत जुळले होते. काम संपले आणि तो मेस्त्री दुसऱ्या जागी गेला, परंतू त्यांचे फोनवर बोलणे सुरुच होते, असे लालबाबूच्या शेजाऱ्यांनी सांगितले. हा मेस्त्री १२ एप्रिलला तिथे आला होता, त्याच्यासोबत रिंकू देवी पळून गेली.

Web Title: Husband home guard duty, wife absconds leaving two children at home with Boyfriend in Bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.