चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून

By दिपक ढोले  | Published: May 20, 2023 08:20 PM2023-05-20T20:20:49+5:302023-05-20T20:21:14+5:30

२६ वर्षीय विवाहितेचा पतीनेच गळा आवळून केला खून

Husband killed his wife due to suspicion of character | चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून

चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून

googlenewsNext

दीपक ढोले, जालना: चारित्र्याच्या संशयावरून २६ वर्षीय विवाहितेचा पतीनेच गळा आवळून खून केल्याची घटना जाफराबाद तालुक्यातील शिराळा येथे शुक्रवारी रात्री घडली. सुवर्णा देवराव गायकवाड (२६) असे मयत महिलेचे नाव आहे.

सुवर्णा गायकवाड यांचे लग्न संशयित देवराव सखाराम गायकवाड याच्याशी झाले होते. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. देवराव गायकवाड हा नेहमीच सुवर्णा यांच्या चारित्र्यावर संशय घेत होता. शुक्रवारी रात्री चारित्र्याच्या संशयावरून त्याने सुवर्णा गायकवाड यांना राहत्या घरात जबर मारहाण केली. शिवाय दोरीने गळा आवळला. यात सुवर्णा या जागीच गतप्राण झाल्या. सुवर्णा यांनी आत्महत्या केली असे भासविण्यासाठी त्याने तोंडावर, अंगावर आणि कपड्यावर विषारी द्रव टाकून पळ काढला. याबाबत मयतेचा भाऊ भागवत डिखुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित पती देवराव गायकवाड याच्याविरोधात टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस आरोपीचा शोध घेत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भोकरदनचे उपविभागीय पोलिस अधिकारी इंदलसिंग बहुरे, टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे सपोनि रवींद्र ठाकरे, पीएसआय सतीश दिंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या घटनेचा पुढील तपास एपीआय रवींद्र ठाकरे करीत आहेत.

नातेवाईक आक्रमक- या घटनेनंतर मयत महिलेचे माहेराकडील नातेवाईक आक्रमक झाले होते. आरोपीला पकडून आणल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला. शेवटी पोलिसांनी समजूत घातल्यानंतर पोलिस बंदोबस्तात शवविच्छेदन करण्यात आले. मयत सुवर्णा यांच्यावर शिराळा येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी आहे. या लेकरांचा आक्रोश पाहून घटनास्थळी अनेकांचे डोळे पाणावले.

Web Title: Husband killed his wife due to suspicion of character

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.