मोबाईल देण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीची सपासप वार करून केली हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 06:16 PM2020-03-11T18:16:33+5:302020-03-11T18:33:29+5:30

जेम्सची पहिली बायको मानखुर्दमध्ये राहते.

Husband killed his wife for refusing to give mobile pda | मोबाईल देण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीची सपासप वार करून केली हत्या 

मोबाईल देण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीची सपासप वार करून केली हत्या 

Next
ठळक मुद्दे ही खळबळजनक घटना चेंबूरमधील म्हाडा कॉलनीत घडली आहे. याबाबत आरसीएफ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नी मृत पावलेली पाहून जेम्सने पळून जाण्याचा प्रयत्न केला.

मुंबई - चेंबूर परिसरात किरकोळ कारणावरून संतापाच्या भरात पतीने पत्नीची हत्या केली. ही खळबळजनक घटना चेंबूरमधील म्हाडा कॉलनीत घडली आहे. याबाबत आरसीएफ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका ५१ वर्षीय इसमाने आपल्याच पत्नीची हत्या केली आहे. पत्नीने मोबाईल देण्यास नकार दिला म्हणून या इसमाने आपल्या पत्नीचा खून केल्याचा पती जेम्सवर आरोप आहेत. ही घटना रविवारी रात्री चेंबुरमधील म्हाडा कॉलनीत घडली. रविवारी जेम्स जॉन करय्या दारू पिऊन घरी आला आणि त्याने पत्नी रबिया जेम्स करय्याकडे तिचा मोबाईल फोन मागितला. रबियाने मोबाईल देण्यास नकार दिल्याने जेम्सला प्रचंड संताप आला. त्यांनतर रागाच्या भरात जेम्सने घरात शिवीगाळ करायला सुरवात केली. थोड्या वेळाने जेम्सने स्वयंपाकघरातील चाकूने रबियावर वार केले. या घटनेत रबियाचा जागीच मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. पत्नी मृत पावलेली पाहून जेम्सने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र शेजारी आणि घरातील काही माणसांनी जेम्सला पोलिसांच्या स्वाधीन केलं.

 

आश्रमशाळेतील मुलीवर माजी विद्यार्थ्याकडून सलग पाच दिवस अत्याचार; आरोपीला अटक

 

धक्कादायक...कुटुंबीयांना बाहेर बसवून तांत्रिक मुलीवर बलात्कार करत होता


आरसीएफ पोलिसांनी याबाबत माहिती देताना जेम्सविरोधात भा. दं. वि. कलम ३०२ अन्वये खुनाचा देखील गुन्हा नोंदवला असल्याचे सांगितले. रबिया ही जेम्सची दुसरी बायको असल्याचं देखील पोलिसांनी सांगितलं. जेम्सची पहिली बायको मानखुर्दमध्ये राहते.

Web Title: Husband killed his wife for refusing to give mobile pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.