कडक चहा न दिल्याच्या रागात पतीने केली गर्भवती पत्नीची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 05:30 PM2020-06-23T17:30:40+5:302020-06-23T17:33:13+5:30
भांडण इतकं विकोपाला गेलं की बबलूने धारदार शस्त्राने गरोदर रेणूचा गळा चिरला आणि तो घटनास्थळावरून फरार झाला.
उत्तर प्रदेशमधील लखीमपुर खिरी जिल्ह्यात एका व्यक्तीने पत्नीने चहा न घेतल्यामुळे पतीने गरोदर पत्नीची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. ही घटना लखीमपूर खिरी जिल्ह्यातील पसगवान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरवार शहरातील आहे. येथे राहणारा आरोपी बबलूला सकाळी साडेपाच वाजता आपल्या कामानिमित्त कुठेतरी जायचे होते. म्हणून त्याने पत्नी रेणूला चहा बनवण्यास सांगितले. रेणूने चहा बनवला तेव्हा बबलूला चहा पसंत आला नाही, म्हणून बबलू आणि रेणू यांच्यात भांडण झालं. यानंतर भांडण इतकं विकोपाला गेलं की बबलूने धारदार शस्त्राने गरोदर रेणूचा गळा चिरला आणि तो घटनास्थळावरून फरार झाला.
क्षुल्लक गोष्टींवरून पत्नीला मारहाण
रेणू आणि बबलूचे १३ वर्षांपूर्वी लग्न झाले होते, त्यांना तीन मुले आहेत आणि रेणू आता ६ महिन्यांची गरोदर होती. बबलू खूप रागीट स्वभावाचा आहे, तो अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींवरून रेणूशी वाद घालत असे. आज सकाळी तो संतापला आणि त्याने ही हत्येची घटना घडवून आणली.
आरोपीच्या शोधात पोलीस
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. घटनास्थळावरून पळून गेलेल्या तिच्या पतीच्या शोधात पोलीस पथके बनवण्यात आली आहेत. या प्रकरणात पोलीस अधीक्षक पूनम यांनी सांगितले की, चहाच्या वादातून बबलूने आपली पत्नी रेणूची हत्या केली. या प्रकरणाचा सखोल तपास केला जात असून आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल.
अन्य महत्वाच्या बातम्या...
धक्कादायक घटना! मंदिरातील 3 साधूंनी केला एका महिलेवर ७ वेळा बलात्कार
६ खोल्या, ३५० कैदी अन् ३ शौचालये; तिहारमधून तळोजा जेलमध्ये पाठवलेल्या नवलखा यांनी उघड केली आपबिती
मैत्रिणीवरील विश्वास नडला; प्लॅन बनवून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार घडवून आणला
मित्राच्या मेहुणीचा बनवला अश्लिल व्हिडीओ; ब्लॅकमेल करत ३ वर्ष केला बलात्कार
पुढच्या महिन्यात पोरीचं लग्न, देवाखातर उघड्यावर आणू नका; ...म्हणून वडिलांना दहशतवाद्यांपुढे जोडावे लागले हात