दुसऱ्या पत्नीची चाकूने हल्ला करत केली हत्या, पती म्हणाला - एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 09:34 AM2023-03-16T09:34:32+5:302023-03-16T09:35:06+5:30

Crime News : आरोपीने चौकशी दरम्यान सांगितलं की, त्याची पत्नी चुकीच्या संगतीत राहत होती. तिचे कुणासोबत तरी अनैतिक संबंधही होते. सोबतच ती काहीना काही कारणाने त्रासही देत होती

Husband killed second wife with knife police arrested illicit relation doubt Koderma Jharkhand | दुसऱ्या पत्नीची चाकूने हल्ला करत केली हत्या, पती म्हणाला - एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते

दुसऱ्या पत्नीची चाकूने हल्ला करत केली हत्या, पती म्हणाला - एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते

googlenewsNext

Crime News : झारखंडच्या कोडरमा भागातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे एका व्यक्तीने आपल्या दुसऱ्या पत्नीची चाकूने हल्ला करत हत्या केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन घटनेची चौकशी सुरू केली आहे. आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे आणि त्याची चौकशी केली जात आहे.

आरोपीने चौकशी दरम्यान सांगितलं की, त्याची पत्नी चुकीच्या संगतीत राहत होती. तिचे कुणासोबत तरी अनैतिक संबंधही होते. सोबतच ती काहीना काही कारणाने त्रासही देत होती. याच कारणाने त्याने हे कृत्य केलं. मृत महिलेच्या कुटुंबियांनी सांगितलं की, बुधवारी सकाळी ती रेल्वेने कोडरमा आपल्या सासरी पोहोचली होती. इथे पुन्हा तिचं पतीसोबत भांडण झालं आणि पती भीम पंडितने सुनीताचं चाकूने गळा कापून तिची हत्या केली.

पोलिसांसमोर आरोपी भीम पंडितने आपला गुन्हा कबूल केला आहे. आरोपीने पोलिसांना सांगितलं की, त्याच्या पत्नीने दुसऱ्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते. गेल्या 10 वर्षापासून त्याने पत्नीसोबत कोणतेही संबंध नव्हते. तरीही ती पुन्हा पुन्हा धमकी देत होती की, दोन मुली आणि एक मुलगा त्याचा आहे.

एसपी कुमार गौरव यांनी सांगितलं की, पोलिसांनी पती आणि पहिल्या पत्नीला ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी केली जात आहे. पोलीस म्हणाले की, चौकशी केली जाईल आणि त्यानुसार कारवाई केली जाईल.

Web Title: Husband killed second wife with knife police arrested illicit relation doubt Koderma Jharkhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.