धक्कादायक! चिप्सवरून झालं होतं भांडण, पत्नीचे तुकडे करून कचऱ्यात फेकून आला पती!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 02:53 PM2021-03-30T14:53:03+5:302021-03-30T14:53:21+5:30
थॉमस आणि त्याची पत्नी वॉन दोघेही बालपणापासून मित्र होते. २४ वयाचे असताना दोघांनी लग्न केलं होतं. वॉन (४६) काही वर्षापासून एका दुसऱ्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होती.
एका पतीने आपल्या पत्नीची हत्या करून तिचे तुकडे केले आणि ते एका पिशवीत भरून पार्कमध्ये फेकून आल्याचा खळबळजनक घटना समोर आली आहे. हे कृत्य पतीने केवळ चिप्सच्या पॅकेटसाठी झालेल्या छोट्या भांडणानंतर केल्याचं समजतं. ही घटना मॅनचेस्टरच्या स्टॉरपोर्टमधील आहे.
द मिररमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, आरोपीचं नाव थॉमस मॅकेन(४९) आहे. त्याने पत्नी वॉनची हत्या केली आणि त्यानंतर तिचे तुकडे पार्कमध्ये फेकून आला. यासाठी त्याने कचरा भरल्या जाणाऱ्या ८ पॅकेटचा वापर केला होता. (हे पण वाचा : आई की वैरीण! मुलीला घरातच विसरून बर्थ डे पार्टी करायला गेली आई, सहा दिवसांनी परतली तर....)
मॅनचेस्टर कोर्टमध्ये सुनावणीदरम्यान असे सांगण्यात आले की, थॉमसने ही हत्या लपवण्यासाठी परिवारातील लोकांना आणि मित्रांना पत्नीच्या मोबाइलवरून मेसेजही केले होते. यात वॉन पूर्णपणे ठीक असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण त्याच्या एका मुलाला तेव्हा संशय आला जेव्हा त्याला त्याच्या आईचा मोबाइल वडिलांच्या खिशात मिळाला. आता वॉनच्या शरीराचे तुकडे जमा करण्यात आले असून थॉमसला अटक करण्यात आली आहे. त्यासोबतच त्याने त्याचा गुन्हाही मान्य केला आहे. या हत्येप्रकरणी थॉमसला दोषी ठरवण्यात आले आहे.
वकील कोर्टात म्हणाले की, थॉमस आणि त्याची पत्नी वॉन दोघेही बालपणापासून मित्र होते. २४ वयाचे असताना दोघांनी लग्न केलं होतं. वॉन (४६) काही वर्षापासून एका दुसऱ्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. कारण सतत थॉमसचा तिच्यावरील विश्वास उडाला होता. पण गेल्या काही वर्षात असं काही घडलं ज्याची कल्पनाही केलं जाऊ शकत नाही. (हे पण वाचा : "माझ्या नावावर जमीन करून दिली जात नाही, म्हणून आत्महत्या करतोय"; एका कॉलवरून पोलिसांनी...)
चिप्सवरून झालं भांडण
वकिलांनी कोर्टात सांगितले की, गेल्यावर्षी २३ मे रोजी शेजाऱ्यांनी दोघांच्या भांडणाचे आवाज ऐकले होते. काही वेळाने भांडण संपलं. यानंतर शेजाऱ्याने वॉनला मेसेज करून हालचाल विचारले तर वॉनने सगळं काही ठीक असल्याचं सांगितलं. आणि सोबत चिप्सवरून थोडं भांडण झाल्याचं सांगितलं.
यानंतर मुलाने दोघांना एका पार्टीमध्ये येण्यास सांगितले. पण थॉमसने नकार दिला. तो म्हणाला की, त्याचं वॉनसोबत भांडण झालं आहे आणि ती घरातून पळून गेली आहे. यानंतर लगेच वॉनच्या फोनवरून थॉमसने मुलाला मेसेज केला की, तुझे वडील येत आहेत. ती नंतर स्वत:हून येईल.
मुलांनी बोलवल्यावर सतत थॉमस पत्नीचा फोन वापरून त्यांना ती जिवंत असल्याचं भासवत होता. पण त्याच्या मुलाने आईचा फोन वडिलांच्या खिशात पाहिला. त्यानंतर त्याने मुलांना सांगितले की, वॉन तिच्या पार्टनरकडे गेली आहे आणि तिचा फोन कारमधेच राहिला होता.
केवळ अर्धीच बॉडी मिळाली
दोन दिवसातच वॉनचा काही पत्ता न लागल्याने पोलिसात ती बेपत्ता असल्याचा रिपोर्ट देण्यात आला. नंतर लोकांना पार्कमध्ये कचऱ्याचे ८ पॅकेट सापडले. ज्यात वॉनच्या शरीराचे तुकडे होते. पोलिसांनी सांगितले की, वॉनची अर्धीच बॉडी मिळाली आहे.