दुर्देवी! पत्नी, मुलांची हत्या करुन पतीची आत्महत्या; बंद घरात ५ मृतदेह सापडले; धक्कादायक कारण आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 14:24 IST2023-07-05T14:23:57+5:302023-07-05T14:24:55+5:30
उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

दुर्देवी! पत्नी, मुलांची हत्या करुन पतीची आत्महत्या; बंद घरात ५ मृतदेह सापडले; धक्कादायक कारण आले समोर
उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पोलीस ठाणे हद्दीतील जयरामपूर गावात आज पहाटे एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह आढळून आले. पतीने आधी पत्नीला बेदम मारहाण केली, त्यानंतर तीन मुलांची हत्या केली. यानंतर पतीने स्वतःही आत्महत्या केल्याची घटना समोर आली. सकाळी घरामध्ये मृतदेह पडलेला पाहून लोकांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले.
हुंड्यामध्ये मागितली 7 सीटर आलिशान कार आणि 10 लाख; न मिळताच पतीने दिला ट्रिपल तलाक
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जयरामपूर गावात राहणारे नागेश विश्वकर्मा यांनी बुधवारी सकाळी पत्नी राधिका (३५) हिला बेदम मारहाण केली. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपीने आपल्या तीन निष्पाप मुलांचीही हत्या केली. मोठी मुलगी निकिता, मुलगा आदर्श आणि तीन वर्षांची मुलगी आयुषीची हत्या केल्यानंतर आरोपी नागेश (३७) याने खोलीत गळफास लावून आत्महत्या केली.
बुधवारी सकाळी १० वाजेपर्यंत घराचा दरवाजा उघडला नाही तेव्हा शेजारी राहणाऱ्या सोनू विश्वकर्मा या चुलत भावाने पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांच्या उपस्थितीत दरवाजा तोडला असता घरात एकाच बेडवर तीन मुलांचे मृतदेह आढळून आले. पत्नी राधिकाचा मृतदेहही शेजारीच कॉटवर आढळून आला. पत्नीच्या डोक्यावर जखमेच्या खुणा आहेत. कपड्याच्या सहाय्याने मुलांचा गळा आवळल्याचे दिसत आहे.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेले एसपी अजय पाल शर्मा यांनीही तपास केला. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली असून घटनेचा तपास करत आहे. सर्व मृतदेह ताब्यात घेऊन आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. एकाच घरातील पाच जणांची हत्या झाल्याची बातमी पसरताच परिसरात खळबळ उडाली आहे. संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. मात्र, या घटनेमागचे खरे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नागेश विश्वकर्माने पत्नी आणि तीन मुलांची हत्या केल्यानंतर गळफास लावून आत्महत्या केली. आरोपींनी हे का केले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. फॉरेन्सिक पथके तपास करत आहेत.