संतापजनक! पत्नीने संबंध ठेवण्यास नकार दिल्याने नाराज झाला पती आणि मग....
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 06:20 PM2021-08-10T18:20:06+5:302021-08-10T19:01:40+5:30
आरोपी पतीने सांगितलं की, पत्नी त्याला शरीरसंबंध ठेवू देत नव्हती. यावरून दोघांमध्ये भांडण झालं आणि रागाच्या भरात त्याने पत्नीची हत्या केली.
उत्तर प्रदेशच्या गोरखपूर जिल्ह्यातून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. येथील बांसगांव भागातील तीन महिन्यांआधी लग्न झालेल्या पतीने सोमवारी रात्री आपल्याच पतीचा गळा आवळून हत्या केली. गंभीर स्थिती आधी पत्नी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
सकाळी महिलेच्या भावाला याची माहिती मिळताच त्याने पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी महिलेचा पती, सासरा आणि पतीच्या मोठ्या भावाला अटक केली. आरोपी पतीने सांगितलं की, पत्नी त्याला शरीरसंबंध ठेवू देत नव्हती. यावरून दोघांमध्ये भांडण झालं आणि रागाच्या भरात त्याने पत्नीची हत्या केली.
मीडिया रिपोर्टनुसार, संतकबीरनगर जिल्ह्यातील दसरौली काली जगदीशपूरला राहणाऱ्या सर्वेश मौर्याने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, तिची बहीण सरिता मौर्या(२२)चं लग्न १३ मे २०२१ रोजी बांसगांवातील रामप्रीत यांचा मुलगा हरिशंकरसोबत झालं होतं. (हे पण वाचा : धक्कादायक! बहिणीने बनवला अश्लील व्हिडीओ, मग भावाने ब्लॅकमेल करून मागितले ३० कोटी रूपये आणि...)
आरोप आहे की, लग्नाच्या एक आठवड्यानंतर सगळं काही ठीक सुरू होतं. पण नंतर सासरच्या लोकांनी तिला हुंड्यासाठी त्रास देणे सुरू केलं होतं. ते सतत रक्कम, गाडी आणि इतर वस्तुंची मागणी करत होते. मनाई केली तर तिला मारहाण करत होते. (हे पण वाचा : ज्याच्यासाठी घर सोडून आली त्यानेच दाबला गळा, दुसरीसोबत लग्न करण्यासाठी पहिल्या गर्लफ्रेन्डची हत्या)
बहिणी या सर्व घटनांची माहिती फोनवरून परिवारातील लोकांना देत होती. आरोप आहे की, सोमवारी रात्री सासरच्या लोकांनी हुंड्यावरून सरिताला बेदम मारहाण केली आणि माहेरच्या लोकांना फोन करून सांगितलं की, तुम्ही जर गाडी आणि पैसे दिले नाही तर येऊन आपल्या बहिणीचा मृतदेह घेऊन जा. माहेरचे लोक हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत सरिताचा मृत्यू झाला होता.
तिकडे भाऊ सर्वेशच्या तक्रारीवरून पोलिसांनी पती, सासरा, सासू आणि पतीच्या मोठ्या भावाविरोधात गुन्हा दाखल केला. तर पतीसहीत सासरा आणि मोठ्या भावाला अटक केली. इन्स्पेक्टर राणा देवेंद्र सिंह म्हणाले की, मृतक महिलेच्या भावाच्या तक्रारीनंतर हुंडाबळीचा गुन्हा दाखल करून पतीसहीत तिघांना अटक करण्यात आली आहे.