विवाहित प्रेयसीच्या खुनाचा धक्का, प्रियकराने घेतला गळफास; आलापल्लीजवळ आढळला मृतदेह

By गेापाल लाजुरकर | Published: October 26, 2024 11:07 PM2024-10-26T23:07:32+5:302024-10-26T23:09:06+5:30

आराेपी पतीला अटक, शनिवारी सकाळी मृतदेह आलापल्लीजवळ एका झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला.

Husband killed wife, woman's boyfriend hanged himself at Gadchiroli | विवाहित प्रेयसीच्या खुनाचा धक्का, प्रियकराने घेतला गळफास; आलापल्लीजवळ आढळला मृतदेह

विवाहित प्रेयसीच्या खुनाचा धक्का, प्रियकराने घेतला गळफास; आलापल्लीजवळ आढळला मृतदेह

गडचिराेली : सिराेंचा तालुक्याच्या काेटा पाेचमपल्ली येथे घरगुती भांडणातून पतीने २३ ऑक्टाेबरच्या रात्री झाेपेत असलेल्या पत्नीचा गळा चिरून हत्या केली हाेती. आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून विवाहित महिलेचे गावातीलच एका युवकाशी विवाहबाह्य प्रेम संबंध असल्याच्या संशयातून पतीने महिलेची हत्या केली. दरम्यान, महिलेच्या प्रियकराचाही मृतदेह अहेरी तालुक्याच्या आलापल्लीजवळ २६ ऑक्टाेबर राेजी सकाळी गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला.

लिंगय्या गट्टू येलकुच्ची (३२) रा. काेटा पाेचमपल्ल, असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या प्रियकराचे नाव आहे. समय्या मुत्तय्या बोल्ले याला पत्नी पद्मा हिचे गावातीलच लिंगय्या येलकुच्ची याच्याशी विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय हाेता. याच संशयातून दाेघांमध्ये भांडण हाेत हाेते. गत आठवड्यापासून दाेघांमध्ये खटके उडत हाेते. २३ ऑक्टाेबर राेजी पद्मा हिचा धारदार शस्त्राने खून करून पसार झाला हाेता. या घटनेमुळे प्रियकर लिंगय्या गट्टू येलकुच्ची याच्यावर मोठा मानसिक आघात झाला. ताे अहेरी तालुक्यात फिरत हाेता. त्यानंतर शनिवारी सकाळी त्याचा मृतदेह आलापल्लीजवळ एका झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला.

आराेपी पतीला चार दिवसांची काेठडी

सिरोंचा पोलिसांनी समय्या बोल्ले याला बामणी परिसरातून शुक्रवारी अटक केली. त्याच्याविराेधात कलम १०३ (१) अन्वये गुन्हा नाेंदविला. आराेपी समय्या बाेल्ले याला चार दिवसांची पाेलिस काेठडी सुनावण्यात आली. घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक समाधान चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Web Title: Husband killed wife, woman's boyfriend hanged himself at Gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.