भांडणात साथ दिली नाही म्हणून पतीने केली पत्नीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 04:28 PM2021-09-28T16:28:56+5:302021-09-28T16:29:31+5:30

Crime News : या घटनेनंतर आरोपी जगदीशने घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी सासूने विरार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

Husband Kills His Wife At Virar As She Had Not Helped Him In A Dispute | भांडणात साथ दिली नाही म्हणून पतीने केली पत्नीची हत्या

भांडणात साथ दिली नाही म्हणून पतीने केली पत्नीची हत्या

Next

विरार : विरार पूर्व फुलपाडा परिसरात पतीने पत्नीची हत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. येथील एका पतीने शेजाऱ्यांशी झालेल्या भांडणाचा राग आपल्या पत्नीवर काढला आहे. शेजाऱ्याशी झालेल्या भांडणात पत्नीने सहभाग घेतला नाही, म्हणून आरोपीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी पतीचा शोध सुरू केला आहे. (Husband Kills His Wife At Virar As She Had Not Helped Him In A Dispute)

जगदीश गुरव असे गुन्हा दाखल झालेल्या 35 वर्षीय आरोपी पतीचे नाव आहे. आरोपी जगदीश यांची पत्नी सुप्रिया (वय-25) या गेल्या आठवड्यात आपल्या माहेरी गेल्या होत्या. पत्नी माहेरी गेल्याने जगदीश घरी एकटाच होता. दरम्यान, कपडे सुकायला घालण्यावरून शेजाऱ्यांशी वाद झाला. या किरकोळ वादातून त्याची शेजाऱ्यांशी किरकोळ हाणामारी झाली. त्यामुळे आरोपीने तावातावात आपल्या पत्नीला फोन करत घटनेची माहिती दिली. 

याचबरोबर, आरोपी जगदीशने 'तू लवकर घरी ये, आपल्याला भांडायला जायचे आहे', असे पत्नीला सांगितले. मात्र माहेरी असलेल्या पत्नीने दोन-तीन दिवसात घरी येते, असे सांगत वाद न वाढवण्याचा सल्ला दिला. पण, शेजाऱ्यांशी झालेल्या भांडणात पत्नीने साथ न दिल्याने आरोपी जगदीशला राग अनावर झाला. यामुळे तो थेट सासुरवाडीत गेला आणि पत्नीशीच वाद घालायला सुरुवात केली. वाद वाढल्यानंतर आरोपी जगदीशने धारदार हत्याराने पत्नीच्या छातीत सपासप वार केले. हा हल्ला इतका भयंकर होता की या दुर्दैवी घटनेत पत्नी सुप्रिया हिचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या सासुलाही त्याने मारहाण केली. 

या घटनेनंतर आरोपी जगदीशने घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी सासूने विरार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. विरार पोलीस ठाण्यात कलम 302 प्रमाणे हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपी पतीच्या शोधासाठी 2 विशेष पथके तयार करून रवाना केले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

फुलपाडा परिसरात हत्याकांडाचे सत्र
विरार पूर्व फुलपाडा परिसरात हत्याकांडाचे सत्र सुरूच आहे. बांधकाम व्यावसायिक निशांत कदम यांच्या हत्येनंतर आता पतीने पत्नीची हत्या केल्याने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या परिसरात गस्त वाढवावी अशी मागणी स्थनिक नागरिक करत आहेत.
 

Web Title: Husband Kills His Wife At Virar As She Had Not Helped Him In A Dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.