पती कामावर जायचा, प्रियकर घरी यायचा...; शेवट भयंकर झाला, पत्नीला ठार केलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 08:26 PM2023-04-28T20:26:19+5:302023-04-28T20:27:05+5:30

हॉस्पिटलला पोहचलेल्या पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. तपासात प्रियकर नव्हे तर पतीनेच पत्नीचा खून केल्याचे उघड झाले

Husband kills wife out of anger over immoral relationship, incident in Mumbai | पती कामावर जायचा, प्रियकर घरी यायचा...; शेवट भयंकर झाला, पत्नीला ठार केलं

पती कामावर जायचा, प्रियकर घरी यायचा...; शेवट भयंकर झाला, पत्नीला ठार केलं

googlenewsNext

मुंबई - पती कामावर जायचा, प्रियकरी घरी यायचा. शेजाऱ्यांना सगळं माहिती पडायचं. पतीला पत्नीच्या अनैतिक संबंधांची माहिती मिळाली. त्यामुळे तो आतल्या आत झुरत होता. एकेदिवशी पती घरी परतला तेव्हा त्याचा ३ वर्षाचा मुलगा रडत असल्याचे पाहिले. तर दुसरीकडे पत्नी तिच्या मोबाईलमध्ये चॅटिंग करण्यात गुंग होती. पतीने पत्नीचा मोबाईल हिसकावला आणि मेसेज वाचले तेव्हा त्याचा संताप अनावर झाला. रागाच्या भरात त्याने कैची उचलली आणि पत्नीच्या डोक्यात वार केले. 

पतीने केलेल्या हल्ल्यात पत्नीचा मृत्यू झाला. त्यानंतर पती बाहेर गेला आणि जोरजोरात ओरडत पत्नीच्या प्रियकराने तिच्यावर हल्ला केल्याचं बोलू लागला. हे कृत्य करून पती फरार झाला. त्यानंतर शेजाऱ्यांनी जखमी अवस्थेत पत्नीला सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारावेळी पत्नीचा मृत्यू झाला. हॉस्पिटलमध्ये तैनात पोलीस कर्मचाऱ्यांनी शाहू नगर पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली. 

हॉस्पिटलला पोहचलेल्या पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. तपासात प्रियकर नव्हे तर पतीनेच पत्नीचा खून केल्याचे उघड झाले. ही घटना शुक्रवारी २६ एप्रिलला रात्री ११ वाजता घडली होती. आरोपी पती सुरेश विश्वकर्मा जो कारपेंटर आहे. रात्री उशीरा कामावरून घरी यायचा. शेजाऱ्यांनी त्याला सांगितले जेव्हा तू घरी नसतो तेव्हा एक व्यक्ती घरी येतो आणि खूप वेळ घरातच असतो. पोलिसांनी आरोपीची चौकशी केली तेव्हा तो दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांनी खाकी वर्दीचा हिसका दाखवताच आरोपीने पत्नीची हत्या केल्याचा गुन्हा कबूल केला. 

Web Title: Husband kills wife out of anger over immoral relationship, incident in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.