खळबळजनक! पैशाच्या वादातून पतीने केली पत्नीची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 08:15 PM2020-05-30T20:15:13+5:302020-05-30T20:17:26+5:30
याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी पती बाळू खरात (४५) विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मृत पत्नीचे नाव शालन असं आहे.
कल्याण : पैशांवरुन होणाऱ्या वादातून पतीने आपल्या पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची घटना आंबिवली परिसरात शनिवारी सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी पती बाळू खरात (४५) विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मृत पत्नीचे नाव शालन असं आहे.
तिपन्नानगर परिसरात राहणारा बाळू भंगार विक्रेता आहे. दोन लग्न केलेल्या बाळूचे दुसरी पत्नी मालन हिच्यासोबत पैशावरुन नेहमी भांडण होत होते. दारुच्या नशेत बाळू नेहमीच तिला मारहाण करत होता. शुक्रवारी रात्रीसुध्दा दारुच्या नशेत असलेल्या बाळूचे मालनसोबत भांडण झाले. याच भांडणातून बाळूने मालनची शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास गळा दाबून हत्या केल्याची माहिती खडकपाडा पोलिसांनी दिली.
धक्कादायक... मुलीच्या वाढदिवशीच बापानं मुलाला ठार मारलं, पोलिसांना कारण सांगितलं!