नर्सच्या प्रेमात पडून पतीने पार केल्या सर्व सीमा, पत्नीसमोरच तिच्यासोबत ठेवले संबंध
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 12:30 PM2022-03-02T12:30:55+5:302022-03-02T12:31:13+5:30
Rajasthan Crime News : पीडितेकडून देण्यात आलेल्या तक्रारीनुसार १२ वर्षाआधी तिचं लग्न धनारी येथे राहणाऱ्या हरेंद्र डूडीसोबत झालं होतं. त्यांना दोन मुलं आहेत.
राजस्थानच्या (Rajasthan) नागोरमधून एक फारच खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे एक व्यक्ती नर्सच्या प्रेमात असा काही पडला की, त्याने पत्नीलाही सोडलं. पीडित पत्नीचा आरोप आहे की, पतीने सर्व सीमा पार करत तिच्यासमोरच प्रेयसीसोबत शारीरिक संबंध ठेवले. तिने जेव्हा याचा विरोध केला तेव्हा पतीने प्रेयसीसोबत मिळून तिला मारहाण केली. इतकंच नाही तर जीवे मारण्याची धमकीही दिली. आता पीडित महिलेने पोलिसांकडे मदतीसाठी धाव घेतली आहे. महिलेने पती, त्याची प्रेयसीसहीत चार लोकांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
पीडितेकडून देण्यात आलेल्या तक्रारीनुसार १२ वर्षाआधी तिचं लग्न धनारी येथे राहणाऱ्या हरेंद्र डूडीसोबत झालं होतं. त्यांना दोन मुलं आहेत. एक १० वर्षांचा तर एक तीन वर्षांच. पीडितेने रिपोर्टमध्ये सांगितलं की, ती गेल्या ५ वर्षापासून पतीसोबत बीकानेरमध्ये राहते. तिथे तिचा पती हरेंद्र क्लीनिक चालवतो.
पतीने केली मारहाण
पीडितेने आरोप लावला आहे की, त्याच्या क्लीनिकमध्ये एक २६ वर्षीय तरूणी नर्सचं काम करते. हरेंद्र आणि तिच्यात बऱ्याच दिवसांपासून अफेअर सुरू आहे. तिला जेव्हा याची खबर लागली तेव्हा तिने पतीला समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्याने समजून घेण्याऐवजी तिला मारहाण केली. त्यानंतर तो नर्सला घरी आणू लागला होता.
पत्नीसमोरच प्रेयसीसोबत संबंध
पीडितेने आरोप केला की, साधारण एक महिन्याआधी हरेंद्र त्याच्या प्रेयसीला घरी घेऊन आला होता. हरेंद्रने तिला सांगितलं की, त्याने त्याच्या प्रेयसीसोबत लग्न केलं आहे. तेव्हापासून ती नर्स त्यांच्या घरात राहू लागली. यादरम्यान दोघांनी अनेकदा तिच्यासमोरच संबंध ठेवले. याचा विरोध केला तर महिलेला मारहाण करण्यात आली.
पत्नीचे दागिनेही घेतले
त्यानंतर २५ फेब्रुवारीच्या रात्री हरेंद्रने प्रेयसीसोबत मिळून तिला मारहाण केली. पती आणि प्रेयसीने तिला जीवे मारण्याची धमकीही दिली. यानंतर ती तेथून कशीतरी जीव मुठीत घेऊ पळाली आणि आपल्या वडिलांना या प्रकाराची माहिती दिली. पीडिता म्हणाली की, पतीच्या प्रेयसीने तिचे दागिनेही घेतले. त्यानंतर ती वडिलांच्या घरी आली.
पीडित महिलेने सांगितलं की, हरेंद्र आणि त्याची प्रेयसी माझ्यावर घटस्फोटासाठी दबाव टाकत आहे. याला वैतागून पीडितेने पती आणि त्याच्या प्रेयसी विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. त्यासोबतच नर्सच्या वडिलांना आणि भावालाही आरोपी ठरवण्यात आलं. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आणि पुढील चौकशी करत आहेत.