प्रेयसीसोबत पतीने पत्नीस व्हिडीओ कॉल केला अन् तिने उचलले टोकाचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 08:22 PM2021-03-28T20:22:04+5:302021-03-28T20:23:06+5:30
Suicide Attempt : त्याने आपल्या गर्लफ्रेंडसोबत काही फोटो आणि व्हिडीओ देखील पत्नीला पाठवले होते. नंतर पत्नीने पतीविरोधात आणि त्याच्या प्रेयसीविरोधात तक्रार दाखल केली आहे.
एक घटना धक्कादायक गुजरातच्यासूरतमधून उघडकीस आली आहे. एका विवाहित महिलेने आपल्या पतीच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यानंतर महिलेची प्रकृती बिघडली आहे. आरोपी पतीने या धक्कादायक घटनेच्या आधी आपल्या पत्नीला व्हिडिओ कॉल करून तो आपल्या गर्लफ्रेंडसोबत असल्याचे सांगितले. तसेच त्याने आपल्या गर्लफ्रेंडसोबत काही फोटो आणि व्हिडीओ देखील पत्नीला पाठवले होते. नंतर पत्नीने पतीविरोधात आणि त्याच्या प्रेयसीविरोधात तक्रार दाखल केली आहे.
मनोज आणि त्याची प्रेयसी पत्नीला मानसिक त्रास देऊ लागले. या सर्व त्रासाला कंटाळून महिला आपल्या माहेरी निघून गेली. नंतर मनोजने पत्नीला व्हिडीओ कॉल केला आणि गर्लफ्रेंडसोबत असल्याचं सांगितलं. तसेच त्याने हद्द पार करत गर्लफ्रेंडसोबतचे आपले फोटो आणि व्हिडीओ पत्नीला पाठवले. हे सर्व पाहून पत्नीच्या पायाखालची जमीन सरकली आणि हैराण झालेल्या महिलेने फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तात्काळ तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारानंतर महिलेची प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी स्थानिक अडाजण पोलिसांनी पीडित पत्नी मीनाने पती आणि त्याच्या प्रेयसीविरोधात तक्रार दाखल केली असल्याचं सांगितले. यानंतर पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत, अशी माहिती न्यूज १८ लोकमतने दिली आहे.
गवत कापण्याच्या वादातून मत्तीवडेत एकाचा खून
पत्नीचा २१ वर्षांपूर्वी खून करून फरारी पतीला अटक
हे प्रकरण सूरतच्या अडाजणमधील रेवानगर येथील आहे. येथे पीडित पत्नी पती मनोजसोबत राहते. पत्नीने ११ वर्षांपूर्वी मनोजसोबत प्रेमविवाह केला होता. मनोज केबलचा व्यवसाय करतो. पीडित पत्नीचे माहेर अमरेलीमध्ये आहे. या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगीही आहे. काही दिवसांपूर्वीच महिलेच्या पतीचे विवाहबाह्य संबंध आहेत हे समजले. याच कारणावरुन दोघांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली. या दरम्यान मनोजने पत्नीला मारहाणही केली.