धक्कादायक! पतीने केली पत्नीची हत्या, मुलगी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 12:24 PM2019-04-26T12:24:08+5:302019-04-26T12:26:15+5:30
घरगुती वादातून एका रिक्षा चालकाने कल्याणमध्ये आपल्या पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये मुलगी देखील जखमी झाली आहे. कल्याण पश्चिमेकडील ठाणकर पाडा येथे ही घटना घडली आहे.
कल्याण - घरगुती वादातून एका रिक्षा चालकाने कल्याणमध्ये आपल्या पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये मुलगी देखील जखमी झाली आहे. कल्याण पश्चिमेकडील ठाणकर पाडा येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात पती मोहन महाजन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू केला आहे. मोहनच्या मुलीचे लग्न ठरले होते मुलीच्या लग्नपत्रिकेवर नाव टाकण्यावरून झालेल्या वादातून त्याने हे कृत्य केले असावे असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण येथील पश्चिम ठाणकर पाडा परिसरात मोहन महाजन आपली पत्नी मनीषा व मुलगी गौरवी सोबत राहत होता. मोहन हा रिक्षा चालक आहे. मोहनची मुलगी गौरवी हिचे लग्न ठरले होते. गुरुवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास मोहनचा पत्नी सोबत वाद झाला याच वादातून संतापलेल्या मोहनने चाकूने पत्नी मनीषा व मुलगी गौरवीवर हल्ला केला. या पत्नी मनीषा हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर मुलगी गौरवी ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात मोहनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.