"पप्पांनीच मम्मीला..."; 2 वर्षांच्या लेकीने पोलिसांना सांगितलं नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 06:35 PM2024-03-11T18:35:24+5:302024-03-11T18:36:12+5:30

पोलिसांनी निष्पाप चिमुकलीची चौकशी केली असता तिने आपल्या वडिलांनी केलेल्या धक्कादायक कृत्याबद्दल सांगितलं आहे.

husband murdered wife daughter tells kanpur police that father murdered her | "पप्पांनीच मम्मीला..."; 2 वर्षांच्या लेकीने पोलिसांना सांगितलं नेमकं काय घडलं?

"पप्पांनीच मम्मीला..."; 2 वर्षांच्या लेकीने पोलिसांना सांगितलं नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये दोन दिवसांपूर्वी एका व्यक्तीने आपल्या पत्नीला बेदम मारहाण केली होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तो हा गुन्हा करत असताना त्याची दोन वर्षांची मुलगीही जवळच होती. पोलिसांनी निष्पाप चिमुकलीची चौकशी केली असता तिने आपल्या वडिलांनी केलेल्या धक्कादायक कृत्याबद्दल सांगितलं आहे.

नवाबगंज परिसरात गेल्या शनिवारी रीमा (38 वर्षे) पती फागुनीसोबत जागेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेली होती. तिच्या कुशीत 2 वर्षांची निरागस मुलगी राखीही होती. पती दारूच्या नशेत होता आणि रस्त्यातच त्याचा पत्नीशी काही कारणावरून वाद झाला. यानंतर त्याने मुलीला खाली उतरवलं आणि पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. 

आधी पत्नीवर विटेने वार केले आणि नंतर तिच्या डोक्यावर विळा मारला. यानंतर पत्नीला तेथे सोडून तो पळून गेला. पोलिसांना माहिती मिळताच त्यांना मुलगी रडत असल्याचं दिसलं, तिला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आणि महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

काही वेळाने महिलेचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी निष्पाप मुलीला विचारले - 'बेटा, तुझ्या आईला कोणी मारलं?'. त्यावर तिने पप्पांनीच मम्मीला मारल्याचं सांगितलं. निष्पाप मुलीने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सोमवारी नराधमाला अटक केली.

नवाबगंजचे एसीपी महेश कुमार यांनी सांगितलं की, महिला तिच्या पतीसोबत जागेश्वर मंदिराकडे गेली होती. रस्त्यात त्याने पत्नीला मारहाण केली आणि तिच्यावरही विळ्याने हल्ला केला. आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच, मुलीला तिच्या आजीच्या ताब्यात देण्यात आले आहे.
 

Web Title: husband murdered wife daughter tells kanpur police that father murdered her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.