चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा डोक्यात खोरे घालून खून; पतीवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 07:29 PM2020-03-20T19:29:02+5:302020-03-20T19:38:24+5:30
वीटभट्टीवर खून झालेली महिला काम करत होती.
बारामती : चारित्र्याच्या संशयावरुन वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुर महिलेचा तिच्या पतीने डोक्यात खोरे घालुन खुन केल्याची घटना मळद (ता.बारामती) येथे शुक्रवारी(दि २०) सायंकाळी घडली.याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी विवाहितेचा भाऊ अनिल उर्फ गोपीनाथ मधुकर मदने (वय ३३,मूळ रा. खतगाव ता. करमाळा जि. सोलापूर, सध्या रा.मळद, बारामती जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.त्यानुसार पती भैरू भानुदास शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अश्विनी भैरु शिंदे असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. मळद येथील आण्णा पाटील वस्तीवरील वीटभट्टीवर ही घटना घडली. या घटनेमुळे
परीसरात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी सायंकाळी ४.४५ च्या सुमारास अश्विनी शिंदे ही वीटभट्टीवर विटा थापत होती.यावेळी भैरु याने तिच्या चारित्रावर संशयावरून तसेच पैशाच्या कारणावरुन तिच्या डोक्यात खोरे मारून तिचा खुन केल्याचे फिर्यादीमध्ये नमुद करण्यात आले आहे. पुढील तपास औंदुबर पाटिल करत आहेत.