सासरी जाऊन पत्नीची पट्ट्यानं धुलाई; सासरच्यांनी जावयाला चोप चोप चोपलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 01:53 PM2021-09-06T13:53:07+5:302021-09-06T13:54:40+5:30

हुंड्यावरून सुरू झालेला वाद विकोपाला; पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

husband reaching in laws house beats wife with belt in gwalior | सासरी जाऊन पत्नीची पट्ट्यानं धुलाई; सासरच्यांनी जावयाला चोप चोप चोपलं

सासरी जाऊन पत्नीची पट्ट्यानं धुलाई; सासरच्यांनी जावयाला चोप चोप चोपलं

googlenewsNext

ग्वाल्हेर: हुंड्याप्रकरणी नवविवाहितेचा छळ करण्यात आल्याची घटना मध्य प्रदेशातल्या ग्वाल्हेरमध्ये घडली आहे. आई वडिलांकडून १० लाख रुपये न आणल्यानं सासरच्या मंडळींनी नवविवाहितेला घराबाहेर काढलं. त्यानंतर पत्नी माहेरी गेली. पत्नी हुंडा आणत नसल्यानं जावयानं त्याच्या कुटुंबीयांसह सासरवाडीत घुसून पत्नी, सासऱ्यासह मेहुण्याला मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी जावयासह त्याच्या कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ग्वाल्हेरमध्ये बहोडापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असलेल्या साधनाचा विवाह गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये महाराजपुरा येथे राहणाऱ्या अमनसोबत झाला. लग्नाला ५ महिनेदेखील पूर्ण झाले नसताना अमन आणि त्याच्या कुटुंबानं साधना आणि तिच्या वडिलांकडून १० लाखांची मागणी सुरू केली. मागणी पूर्ण होत नसल्यानं अमन साधनाला सासरी सोडून आला. साधनाच्या कुटुंबीयांनी संवादातून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. पण उपयोग झाला नाही.

साधनाच्या कुटुंबीयांना समाजाच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले. मात्र प्रश्न समाजासमोर आल्यानं अमन आणि त्याचे कुटुंबीय संतापले. त्यांनी साधनाच्या घरात घुसून साधनासह आई, वडील, भावाला मारहाण केली. अमननं साधनाला पट्ट्यानं मारहाण केली. यामुळे भडकलेल्या सासरच्या मंडळींनी अमनला चोपलं. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस अमन आणि त्याच्या कुटुंबाविरोधात कारवाई करत आहेत. अमन आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी मारहाण आणि घरात लूटमार केल्याचा आरोप साधनाच्या वडिलांनी केला आहे.

Web Title: husband reaching in laws house beats wife with belt in gwalior

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.