पत्नीला चहा बनवायला पाठवले, जिजूकडून खोलीत मेहुणीवर बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 12:22 PM2021-03-14T12:22:57+5:302021-03-14T12:23:27+5:30
Crime News: अलवर गेट पोलीस ठाण्याच्या अधिकारी सुनिता गुर्जर यांनी सांगितले की, दोन बहीणी येथे अभ्यासासाठी राहत होत्या. मोठ्या बहीणीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तीचे लग्न झाले आहे तर छोट्या बहीणीचे लग्न झालेले नाही.
अजमेर : अजमेरमध्ये एका नराधमाने त्याच्या छोट्या मेहुणीवरच बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आरोपीने त्याची पत्नी घरात असताना ही प्रकार केल्याने नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेने खळबळ उडाली आहे. (Sister in law raped by Jiju in Ajmer.)
आरोपी पतीने त्याच्या पत्नीला चहा बनविण्यास सांगितले. चहा बनविण्यासाठी पत्नी किचनमध्ये निघून गेली. ती जेव्हा चहा घेऊन बाहेर आली तेव्हा पतीला तिने आक्षेपार्ह अवस्थेत तिच्या बहीणीसोबत पाहिले. संतापलेल्या पत्नीने लगेचच पतीच्या थोबाडीत ठेवून दिली आणि अलवरच्या पोलिसांमध्ये जाऊन तक्रार नोंदविली.
अलवर गेट पोलीस ठाण्याच्या अधिकारी सुनिता गुर्जर यांनी सांगितले की, दोन बहीणी येथे अभ्यासासाठी राहत होत्या. मोठ्या बहीणीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तीचे लग्न झाले आहे तर छोट्या बहीणीचे लग्न झालेले नाही. तिचा पती 17 फेब्रुवारीला एका लग्नाला सोबत जाऊन परतला होता. तो जयपूरला निघाला होता. त्याआधी त्यांने पत्नीला चहा बनविण्यास सांगितले. ती जेव्हा चहा बनवायला गेली तेव्हा तिच्या पाठीमागे त्याने मेहुणीवर जबरदस्ती बलात्कार केला.
जेव्हा पत्नी चहा घेऊन माघारी आली तेव्हा पतीला बहीणीसोबत आपत्तीजनक परिस्थितीत पाहिले आणि तिच्या पायाखालची जमिनच सरकली. यानंतर तिने पतीला शिव्याशाप देत कानाखाली मारले. यानंतर त्या दोघी गावी निघून गेल्या.
पोलिसांनी सांगितले की, मोठ्या बहीणीला छोट्या बहीणीने कुटुंबियांना घडलेला प्रकार नको सांगू असे सांगितले होते. तरीही तिने तिच्या वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. यानंतर छोट्या बहीणीला न्याय देण्यासाठी मोठी बहीण पुन्हा अजमेरला आली आणि पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत पीडीतेची वैद्यकीय चाचणी केली आहे. तसेच आरोपीचा शोधही सुरु केला असून त्याला लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असेही पोलिसांनी सांगितले.