दारुची नशा नडली; विरोध करणाऱ्या पत्नीचा खून केला, जन्मठेप भोगणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 04:07 PM2020-10-31T16:07:07+5:302020-10-31T16:10:37+5:30

Court: न्यायालयाने समोर आलेले पुरावे व सरकारी वकीलांचे मुद्दे पाहता आरोपी दोषी धरुन जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Husband sentenced to life imprisonment for murdering wife | दारुची नशा नडली; विरोध करणाऱ्या पत्नीचा खून केला, जन्मठेप भोगणार

दारुची नशा नडली; विरोध करणाऱ्या पत्नीचा खून केला, जन्मठेप भोगणार

Next

जळगाव :  पत्नीच्या खून केल्याच्या गुन्ह्यात रवींद्र सुपडू पाटील (३८, रा.वेरुळी खुर्द, ता.पाचोरा) याला जिल्हा सत्र न्यायालयाने याला शनिवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्या.आर.जे.कटारिया यांनी हा निकाल दिला.


या घटनेबाबत अधिक माहिती अशी, ७ सप्टेबर २०१८ रोजी सायंकाळी रवींद पाटील हा दारु पिण्यासाठी बाहेर जायला निघाला असता पत्नी उमा हिने त्यास विरोध केला होता. त्यामुळे रात्री १ वाजता रवींद्र पाटील याने पत्नी उमा हिचा गळा दाबून व विष पाजून हत्या केली होती. मयत उमा हिचा भाऊ गौरव युवराज पाटील यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात फियार्द दिल्यावरुन खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. तपासाधिकारी अनिल शिंदे यांनी या गुन्ह्याचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

हा खटला न्या.आर.जे.कटारिया यांच्या न्यायालयात चालला. यात सरकारतफेर् ११ साक्षीदार तपासण्यात आले. मयताचा मुलगा व प्रत्यक्षदशर्प साक्षीदार असलेला सोहम रवींद्र पाटील याच्यासह शवविच्छेदन करणारे डॉ.रमेश गढरी, वैद्यकिय तपासणी करणारे डॉ. अमित साळुंखे यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. सरकारी वकील चारुलता बोरसे यांनी पुराव्याच्या आधारावर प्रखर युक्तीवाद करुन आरोपीला जन्मठेपेचीच शिक्षा मिळावी म्हणून मागणी केली. न्यायालयाने समोर आलेले पुरावे व सरकारी वकीलांचे मुद्दे पाहता आरोपी दोषी धरुन जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपीकडून ॲड.अविनाश जाधव यांनी बाजू मांडली. पैरवी अधिकारी देविदास कोळी यांचे या खटल्यात सहकार्य लाभले.

Web Title: Husband sentenced to life imprisonment for murdering wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून