ठाणे: पत्नी, मुले घरात असताना पतीचा दारुच्या नशेत गोळीबार; कौटुंबिक वादाचे कारण आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 09:33 PM2022-04-15T21:33:37+5:302022-04-15T21:35:44+5:30
सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. हा प्रकार कौटुंबिक कहलातून घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
ठाणे : सासऱ्याने सुनेवर गोळीबार केल्याची घटना ठाण्यात गुरुवारी घडली असतानाच, दोन मुले आणि पत्नी घरात असताना राजेश शर्मा (५१) याने दारुच्या नशेत गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ठाण्यातील एका उच्चभ्रू सोसायटीत घडली. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. हा प्रकार कौटुंबिक कहलातून घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणी राजेश याला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.
माजीवडा येथील लोढा लक्झरिया संकुलातील क्लेरेमॉंट बी इमारतीत राजेश शर्मा हा पत्नी आणि तीन मुलांसह राहतो. त्याची तिन्ही मुले कामधंदा करीत नसून, राजेश शर्मा हा स्वत:देखील कोणतेच काम करीत नाही. त्यामुळे पितापुत्रांमध्ये वारंवार भांडणे होतात. त्यातच राजेश व्यसनाच्या आहारी गेला आहे. शुक्रवारी सायंकाळी दारूच्या नशेत असताना, त्याने परवानाधारक बंदुकीतून गोळीबार केला. या गोळ्या दरवाजा आणि इतरत्र लागल्या. यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही. गोळीबार करणाऱ्या शर्माला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कौटुंबिक कहलातून हा प्रकार घडल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. ज्या बंदुकीतून गोळीबार झाला ती बंदूक परवानाधारक आहे. याप्रकरणी शर्मा याला ताब्यात घेतले आहे. - उत्तम सोनावणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कापूरबावडी पोलीस ठाणे