विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने घातला घाव अन्... 

By पूनम अपराज | Published: November 3, 2020 05:16 PM2020-11-03T17:16:35+5:302020-11-03T17:17:34+5:30

Murder : या घटनेनंतर कुटुंबीय अंत्यसंस्कारासाठी तयारी करीत होते. दरम्यान कोणीतरी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपी पती रवींद्र निषाद याला अटक केली.

Husband stabs his wife with an axe on suspicion of having an extramarital affair | विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने घातला घाव अन्... 

विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने घातला घाव अन्... 

Next
ठळक मुद्दे सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास पुन्हा एकदा दोघांमध्ये वाद झाला. त्याचवेळी पतीने घरात ठेवलेल्या कुऱ्हाडीने तेतरीच्या डोक्यावर वार केला, ज्यामुळे ती रक्ताच्या थारोळ्यात पडली.

गोरखपूरमधील चिलुआताल परिसरातील अमवा गावच्या दौलतपूर टोला येथे पतीने अवैध संबंध असल्याच्या संशयावरून पत्नी तेतरी देवी (वय 35) हिचा कुऱ्हाडीने वार करून हत्या जीवे मारले. या घटनेनंतर कुटुंबीय अंत्यसंस्कारासाठी तयारी करीत होते. दरम्यान कोणीतरी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपी पती रवींद्र निषाद याला अटक केली.

पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे. दुसरीकडे, मुलगी म्हणते की, वडिलांची मानसिक स्थिती चांगली नाही, त्यामुळे ते बर्‍याचदा रागावतात आणि हिंसक होतात. याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र निषाद एक इलेक्ट्रिशियन आहे, तर पत्नी तेतरी देवी चौरस्त्यावर किराणा दुकान चालविते. यावरून दोघांमध्ये वाद व्हायचा. सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास पुन्हा एकदा दोघांमध्ये वाद झाला. त्याचवेळी पतीने घरात ठेवलेल्या कुऱ्हाडीने तेतरीच्या डोक्यावर वार केला, ज्यामुळे ती रक्ताच्या थारोळ्यात पडली.

आई पडताना पाहून मुलांनी आरडाओरडा केला आणि आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्याचदरम्यान तिचा मृत्यू झाला. यानंतर मृतदेह घरी आणला आणि कुटुंबीयांनी अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. दरम्यान, या घटनेची माहिती कुणीतरी पोलिसांना दिली. माहिती मिळताच एसएसपी जोगेंद्र कुमार आणि निरीक्षक चिलुआताल नीरज राय पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी पतीला अटक केली. त्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठविण्यात आला. तेतरीला चार मुली आणि एक मुलगा आहे. एसपी उत्तर अरविंद पांडे यांनी सांगितले की, नवऱ्याने आपल्या पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला केला आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला. पतीला अटक करुन कायदेशीर कारवाई केली जात आहे.
 

Web Title: Husband stabs his wife with an axe on suspicion of having an extramarital affair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.