पतीचं तोंड ब्लॅंकेटने दाबून केली हत्या, पत्नीस प्रियकरासह अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 09:20 PM2022-05-15T21:20:18+5:302022-05-15T21:21:01+5:30

Murder Case : पोलिसांनी आरोपींकडून हत्येसाठी वापरलेलं ब्लँकेट, विषारी पावडरची डब्बी, नशेच्या गोळ्यांचे रॅपर आदी साहित्य जप्त केले आहे.

Husband strangled to death with a blanket, wife arrested with boyfriend | पतीचं तोंड ब्लॅंकेटने दाबून केली हत्या, पत्नीस प्रियकरासह अटक

पतीचं तोंड ब्लॅंकेटने दाबून केली हत्या, पत्नीस प्रियकरासह अटक

googlenewsNext

उत्तर प्रदेशातील गाझियाबादच्या नंदग्राम पोलीस  ठाण्याच्या हद्दीत १ मे रोजी भाजी विक्रेत्याच्या झालेल्या हत्येची उकल पोलिसांनी केली आहे. या प्रकरणी मृताची पत्नी आणि तिच्या प्रियकरासह तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून हत्येसाठी वापरलेलं ब्लँकेट, विषारी पावडरची डब्बी, नशेच्या गोळ्यांचे रॅपर आदी साहित्य जप्त केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश कुमार शर्मा हा मूळचा अनुपशहर बुलंदशहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परळी गावचा रहिवासी असून तो नंदग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवीन वस्तीत पत्नी कुसुमसोबत राहत होता. तो भाजीची गाडी लावायचा. नंदग्रामचे एसएचओ अमित कुमार यांनी सांगितले की, १ मे रोजी राकेश कुमारचा घरात संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता. राकेश बेशुद्ध पडला असून त्याला श्वासही घेता येत नसल्याची माहिती त्याची पत्नी कुसुमने आपला दिर मुकेश यांना दिली होती. माहिती मिळताच बुलंदशहरहून आलेल्या नातेवाईकांनी राकेशला रुग्णालयात नेले, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, २ मे रोजी अंत्यसंस्कार करण्यापूर्वी राकेशच्या शरीरावर जखमेच्या खुणा पाहून कुटुंबीयांना संशय आला. त्यानंतर त्यांनी अनुपशहर पोलिसांना माहिती दिली. अनुपशहर पोलिसांनी बुलंदशहरमध्ये मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केले. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये राकेशची हत्या झाल्याची माहिती उघड झाली आहे. यानंतर कुटुंबीयांनी कुसुमवर खुनाचा संशय व्यक्त केला.

क्राइम :13 वर्षाच्या मुलाने टॉयलेटमध्ये 1 वर्षाच्या चिमुरडीची केली हत्या, वडिलांच्या अपमानाचा बदला

नंदग्रामचे एसएचओ अमित कुमार म्हणाले की, कुसुमची ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर तिने पतीची हत्या केल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी कुसुमचा प्रियकर मनोज आणि त्याचा साथीदार गौरव चौहान राहणारे बुलंदशहर यांनाही अटक करण्यात आली. प्रेमप्रकरणामुळे कुसुम दहा महिन्यांपूर्वी प्रियकर मनोजसोबत गेली होती. मात्र, पती आणि सासरच्या लोकांनी समजवल्यानंतर कुसुम परत आली होती. मनोजशी तिचं बोलणं सुरूच होतं. तिने मनोजसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, तिचा नवरा तिच्या मार्गात अडथळा ठरत होता, त्यामुळे दोघांनी मिळून तिच्या हत्येचा कट रचला. १ मे रोजी कुसुमने पतीला पावडरमध्ये नशेच्या गोळ्या मिसळून दिलं. झोपल्यानंतर मनोज आणि त्याचा साथीदार गौरव यांनी राकेशचा चेहरा ब्लँकेटने दाबून खून केला.

 

Web Title: Husband strangled to death with a blanket, wife arrested with boyfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.