पतीने केली गळा आवळून हत्या, नालासोपाऱ्याच्या यशवंत गौरव रोड परिसरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 11:23 AM2022-09-05T11:23:40+5:302022-09-05T11:25:53+5:30

नालासोपाऱ्याच्या यशवंत गौरव रोडवरील विनय काॅम्प्लेक्समधील आनंद व्ह्यू बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या भाविक ठक्कर (२५) याने त्याची पत्नी मुन्नी (२२) हिची हत्या केली आहे.

Husband strangulated to death, incident in Yashwant Gaurav Road area of Nalasopara | पतीने केली गळा आवळून हत्या, नालासोपाऱ्याच्या यशवंत गौरव रोड परिसरातील घटना

पतीने केली गळा आवळून हत्या, नालासोपाऱ्याच्या यशवंत गौरव रोड परिसरातील घटना

Next

नालासोपारा : शहरात २५ वर्षीय पतीने २२ वर्षीय पत्नीची रविवारी पहाटेच्या सुमारास गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली आहे. नालासोपारा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी पतीला ताब्यात घेतले असून चौकशीसह तपास करत आहे.

नालासोपाऱ्याच्या यशवंत गौरव रोडवरील विनय काॅम्प्लेक्समधील आनंद व्ह्यू बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या भाविक ठक्कर (२५) याने त्याची पत्नी मुन्नी (२२) हिची हत्या केली आहे. भाविकची फेसबुकवरून या तरुणीशी ओळख झाली होती. या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाल्यानंतर त्यांनी सहा महिन्यांपूर्वी लग्न केले होते. भाविक ठक्कर हा गुजराती असून लग्नानंतर त्याची पत्नी बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्या दोघांमध्ये खटके उडू लागल्याचे सूत्रांकडून कळते. भाविक याच्या पत्नीला काही कारणास्तव २० हजार रुपये हवे होते. या गोष्टीवरून त्यांच्यामध्ये भांडण झाले. या भांडणानंतर त्याने रविवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास रागाच्या भरात तिला जोरात तोंडावर चापट मारून सोफ्यावर पाडून दोन्ही हाताने पत्नीचा गळा दाबून हत्या केली आहे. त्यानंतर आरोपी पतीने ही घटना इमारतीतील इतर रहिवाशांना सांगितली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

पतीने पत्नीची घरगुती भांडणाच्या रागातून हत्या केली आहे. आरोपी पतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याची चौकशी व तपास सुरू आहे. 
- विलास सुपे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नालासोपारा पोलीस ठाणे
 

Web Title: Husband strangulated to death, incident in Yashwant Gaurav Road area of Nalasopara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.