पत्नीच्या चारित्र्यावर घेतला पतीने संशय; गळ्यावर घातले तीन चार कुऱ्हाडीचे घाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 09:27 PM2021-05-26T21:27:00+5:302021-05-26T21:28:38+5:30

Murder Case : पोलिसांना महिलेचा मृतदेह घराच्या छतावर खाली वाकलेला अवस्थेत आढळला. पोलिसांनी त्वरित कारवाई करून आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे.

Husband taken doubts wife's character; Cut the throat with an axe | पत्नीच्या चारित्र्यावर घेतला पतीने संशय; गळ्यावर घातले तीन चार कुऱ्हाडीचे घाव 

पत्नीच्या चारित्र्यावर घेतला पतीने संशय; गळ्यावर घातले तीन चार कुऱ्हाडीचे घाव 

Next
ठळक मुद्देमहिलेच्या माहेरच्यांनी तिचा नवरा अमीलाल, दीर महेंद्र, जाऊ आणि गिरधारी नावाच्या व्यक्तीविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

राजस्थानातील चूरू जिल्ह्यातील दुधवाखारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीने कुरूपपणे आपल्या पत्नीच्या गळ्यावर कुऱ्हाडीचा घाव घातला. आरोपीने पत्नीच्या गळ्यावर ३ ते ४ वेळा कुऱ्हाडीने वार केले आणि तिचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांना महिलेचा मृतदेह घराच्या छतावर खाली वाकलेला अवस्थेत आढळला. पोलिसांनी त्वरित कारवाई करून आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे.

या हत्येचे प्राथमिक कारण पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतल्याचे मानले जात आहे. घटनेनंतर गावात खळबळ उडाली. महिलेच्या माहेरच्यांनी तिचा नवरा अमीलाल, दीर महेंद्र, जाऊ आणि गिरधारी नावाच्या व्यक्तीविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस संपूर्ण प्रकरणाचा खोलवर तपास करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

15 वर्षांपूर्वी झाले लग्न 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुधवाखारा पोलिस स्टेशन परिसरातील  लादडिया गावात ही घटना घडली. याप्रकरणी मृत महिलेचे वडील राजगडच्या गागडवास गावात राहणारे शिवलाल मेघवाल यांनी फिर्याद दिली आहे. शिवलाल यांनी आपल्या जबाबात सांगितले आहे की, त्यांच्या मुलगी मुकेशचे १५ वर्षांपूर्वी  लादडिया गावच्या अमिलालशी लग्न झाले होते. अमीलाल दिवसभर आपल्या मुलीबरोबर भांडण करत असे. यामुळे त्यांची मुलगी मुकेश २ महिन्यांपासून माहेरी आली होती. 23 मे रोजी, ती परत तिच्या सासरी गेली. 25 मे सकाळी 7 नातलगांनी रात्री  अमिलालने मुकेशची कुऱ्हाडीने गळा कापून हत्या केली, अशी माहिती दिली.


एफएसएलच्या पथकाने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले

त्याची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस अधीक्षक आणि पोलिस उपअधीक्षक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेची पाहणी केली आणि एफएसएल टीमच्या मदतीने पुरावे गोळा केले. प्राथमिक तपासणीनंतर पोलिसांनी मृत महिलेच्या आरोपी पती अमिलालला ताब्यात घेतले आहे.  दुधवाखारा  सीएचसी येथील मेडिकल बोर्डाने मृतदेहाचे शवविच्छेदन केले. 

Web Title: Husband taken doubts wife's character; Cut the throat with an axe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.