लिपस्टिकने रूममधील चारही भिंतींवर लिहून गेली पतीच्या अत्याचाराची कहाणी आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 11:52 AM2022-08-11T11:52:14+5:302022-08-11T11:52:45+5:30

Crime News : भिंतीवर लिहिलेल्या सुसाइड नोटच्या आधारे पोलिसांनी मृत महिलेचा पती आणि तिच्या सासरच्या लोकांची चौकशी सुरू केली आहे.

Husband torture written on the wall around the room lipstick in Ranchi | लिपस्टिकने रूममधील चारही भिंतींवर लिहून गेली पतीच्या अत्याचाराची कहाणी आणि मग...

लिपस्टिकने रूममधील चारही भिंतींवर लिहून गेली पतीच्या अत्याचाराची कहाणी आणि मग...

googlenewsNext

Crime News : झारखंडची (Jharkhand) राजधानी रांचीमध्ये एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत महिला चंदाच्या रूममध्ये चारही भिंतींवर लिपस्टीकने आपल्या मृत्यूचं कारण लिहिलं होतं. महिलेने तिच्या मृत्यूसाठी तिचा पती आणि सासरच्या लोकांना जबाबदार ठरवलं.

चंदाने 2019 मध्ये सीसीएल कर्मचारी दिलीप चौहानसोबत लव्ह मॅरेज केलं होतं. लग्नानंतर काही दिवस त्यांच्यात सगळं काही ठीक सुरू होतं. पण नंतर पती-पत्नीमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होऊ लागला होता. कुटुंबियांनी दोघांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला. पण काही फरक पडला नाही. 

ही घटना रांचीपासून 70 किमी अंतरावरील डकरा गावात घडली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. चंदाने तिच्या सुसाइड नोटमध्ये लिहिलं की, तिचा पती तिला नेहमीच मारहाण करत होता. तिला शिव्या देत होता ज्याला वैतागून तिने मृत्यूला कवटाळलं.

मीडिया रिपोर्टनुसार, चंदाने आपल्या दोन मुलींसोबत गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आजूबाजूच्या लोकांनी दरवाजा तोडून दोन्ही मुलींचा जीव वाचवला. जेव्हा लोक घरात आले तेव्हा भितींवर लिहिलेले मेसेज वाचून हैराण झाले.

भिंतीवर लिहिलेल्या सुसाइड नोटच्या आधारे पोलिसांनी मृत महिलेचा पती आणि तिच्या सासरच्या लोकांची चौकशी सुरू केली आहे. सोबतच पोलीस या केसकडे हत्या आणि आत्महत्या दोन्ही दृष्टीने बघत आहे. या घटनेमुळे परिसरात एक गोंधळ निर्माण झाला आहे. 
 

Web Title: Husband torture written on the wall around the room lipstick in Ranchi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.