डास चावले म्हणून पतीला पत्नीने केली मारहाण; डोळ्याला पडले ७ टाके 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 06:28 PM2019-11-15T18:28:30+5:302019-11-15T18:35:40+5:30

पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

Husband unable to pay the electricity bill so mosquito bite, wife and daughter beat him | डास चावले म्हणून पतीला पत्नीने केली मारहाण; डोळ्याला पडले ७ टाके 

डास चावले म्हणून पतीला पत्नीने केली मारहाण; डोळ्याला पडले ७ टाके 

Next
ठळक मुद्देपतीने विजेचे बील न भरल्याने घरामध्ये रात्री डासांनी हौदोस घातला होता त्याच रागातून महिलेने ही मारहाण केल्याची माहिती मिळत आहे.भूपेंद्र याची आर्थिकस्थिती बेताची असल्याने गेल्या दोन महिन्यापासून त्याने विजेचे बिल थकवले होते. भूपेंद्र यांच्या आरडाओरडीचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी मध्यस्थी करून जखमी भूपेंद्र यांची सुटका केली आणि रुग्णालयात दाखल केले.

अहमदाबाद - गुजरातमधील अहमदाबाद  परिसरातील नरोदा येथे धक्कादायक घटना घडली आहे. पतीने विजेचे बिल न भरल्याने पत्नीने आणि मुलीने मिळून मुसळीने जबर मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. पतीने विजेचे बील न भरल्याने घरामध्ये रात्री डासांनी हौदोस घातला होता त्याच रागातून महिलेने ही मारहाण केल्याची माहिती मिळत आहे. या मारहाणीमुळे पीडित पतीच्या उजव्या डोळ्याला सात टाके पडले आहे. शेजाऱ्यांनी जखमीस रुग्णालयात दाखल केले. भूपेंद्र लेउया असं या पीडित पतीचं नाव असून याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

बुधवारी सकाळी ही घटना घडली. भूपेंद्र याची आर्थिकस्थिती बेताची असल्याने गेल्या दोन महिन्यापासून त्याने विजेचे बिल थकवले होते. भूपेंद्र यांची पत्नी संगीता आणि मुलगी चितल यांनी विजेचे बिल न भरल्याने घरातील पंखा बंद असल्याची तक्रार केली. पंखा बंद करुन झोपावे लागत असल्याने रात्री खूप डास चावतात आणि त्यामुळे व्यवस्थित झोप लागत नाही अशी तक्रार या दोघींनी भूपेंद्र यांच्याकडे केली. मात्र याकडे फारसं गांभीर्याने लक्ष न देता झोप नसेल येत तर माझ्या बिछान्यावर येऊन झोप असं उत्तर भूपेंद्र यांनी दिलं. आधीच रात्रभर डास चावल्याने वैतागलेल्या संगीता यांच्या रागाचा पार चढला. नंतर तिने स्वयंपाक घरातील मुसळीने भूपेंद्र यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. भूपेंद्र यांच्या मुलीनेही आईची साथ देत वडिलांना मारहाण करण्यास सुरुवात केली. भूपेंद्र यांच्या आरडाओरडीचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी मध्यस्थी करून जखमी भूपेंद्र यांची सुटका केली आणि रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या उजव्या डोळ्यावर सात टाके पडले आहेत. भूपेंद्र यांनी पत्नी आणि मुलीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Web Title: Husband unable to pay the electricity bill so mosquito bite, wife and daughter beat him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.