5 मुलांची आई पडली प्रेमात, प्रियकराच्या मदतीने काढला नवऱ्याचा काटा; वाढदिवशी फोन केला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 05:21 PM2023-07-24T17:21:01+5:302023-07-24T17:24:26+5:30
मुन्ना साहची पत्नी 4 मुली आणि एका मुलासह भरवाडा टोल येथील तिच्या प्रियकराच्या पोल्ट्री फार्ममध्ये एक महिन्यापासून राहत होती.
बिहारमधील दरभंगाच्या कमरौली गावात राम कुमार साह उर्फ मुन्ना साह याची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्याकांडानंतर मुन्ना साहची पत्नी संगीता देवी आणि तिचा प्रियकर कुंदनलाल दास यांना अटक करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता कमरौली कुंवरपट्टी भरवाडा टोलनाक्यावर घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
डीएसपी इमरान अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुन्ना साहची पत्नी 4 मुली आणि एका मुलासह भरवाडा टोल येथील तिच्या प्रियकराच्या पोल्ट्री फार्ममध्ये एक महिन्यापासून राहत होती. घटनेच्या रात्री आरोपी महिलेने तिच्या पतीला प्रियकराच्या फार्महाऊसवर बोलावून घेतलं. एकुलता एक मुलगा माधव कुमारचा वाढदिवस असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुन्ना साहने त्याच्या गावातील तरुण अनोज कामती याला सांगितले की, आपल्या मुलाच्या वाढदिवसाची पार्टी आहे. मला बाईकने फॉर्मवर घेऊन जा.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुन्ना साह फार्महाऊसवर येताच कुंदनलाल दास आणि संगीता देवी यांनी मुन्ना साहला पकडलं आणि पोल्ट्री फार्मच्या खांबाला दोरीने बांधलं. यानंतर कुंदनलाल दासने मुन्ना साहच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केला. मुन्ना साहच्या उजव्या डोळ्यातून रक्त वाहू लागले. मुन्ना बेशुद्ध पडल्यानंतर संगीता देवी आणि कुंदनलाल यांनी त्याला विटा आणि दगडांनी मारहाण केली.
घटनेचा व्हिडिओ पाहता संगीता देवी तिचा पती मुन्ना साह याला लाथा-बुक्क्यांनी आणि विटा आणि दगडांनी मारहाण करत असल्याचे समजते. मुन्ना शाहची आईही घटनास्थळी पोहोचली होती. तिने आपल्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणीही त्याचे ऐकले नाही. मुन्ना साहला सतत मारहाण करत होते. अखेरीस पत्नी आणि तिच्या प्रियकराने केलेल्या मारहाणीमुळे मुन्ना साहचा मृत्यू झाला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.