पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2021 06:55 PM2021-10-30T18:55:02+5:302021-10-30T18:55:10+5:30

Husband who kills wife is sentenced to life imprisonment : २८ ऑगस्ट २०१७ रोजी पती संजयने शिलाई मशीनसाठी वापरण्यात येणाऱ्या कैचीने पत्नी राजश्रीवर १४ वार केले हाेते.

Husband who kills wife is sentenced to life imprisonment | पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा

पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा

Next

अकाेला : मुर्तीजापूर शहरातील रहीवासी असलेल्या एका कौटुंबिक वादातून पत्नीवर कैचीने वार करून तिचा खून करणाऱ्या पतीला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यनशिवराज खोब्रागडे यांच्या न्यायालयाने दोषी ठरवत शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. संजय भाऊराव निशानराव असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी संजय निशानराव हा त्याच्या पत्नीसह मुर्तिजापूर शहरात राहत होता. २८ ऑगस्ट २०१७ रोजी पती संजयने शिलाई मशीनसाठी वापरण्यात येणाऱ्या कैचीने पत्नी राजश्रीवर १४ वार केले हाेते. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या राजश्रीचा जागेवरच मृत्यू झाला होता. त्यानंतर आराेपी घाबरलेल्या अवस्थेत तो पोलिस ठाण्यात पोहचला. त्याने पोलिसांना आपणच पत्नीचा खून केल्याचे कबूल केल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला. घटनेचा तपास केल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात हा खटला चालला असता सरकार पक्षाने सात साक्षीदार तपासले. आरोपीने पोलिसांसमोर दिलेली गुन्ह्याची कबुली ही कायद्यानुसार ग्राह्य धरल्या जात नसतानाही सरकार पक्षाने परिस्थितीजन्य पुरावे आणि जेव्हा घटना घडली त्यावेळी आरोपी व त्याच्या पत्नीशिवाय तिसरे कुणीही घरात नव्हते तसेच त्याचे कपडे रक्ताने माखलेले असल्याच्या पुरावा महत्वाचा ठरला. दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

Web Title: Husband who kills wife is sentenced to life imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.