ताडवाडी येथे खून करून पसार झालेल्या नवऱ्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 02:11 AM2019-05-09T02:11:51+5:302019-05-09T02:11:58+5:30
कर्जत तालुक्यातील ताडवाडी येथे माहेरी राहत असलेल्या पत्नीने नवºयाला दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत, म्हणून पत्नीला ठार मारण्याची घटना घडली होती.
नेरळ : कर्जत तालुक्यातील ताडवाडी येथे माहेरी राहत असलेल्या पत्नीने नवºयाला दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत, म्हणून पत्नीला ठार मारण्याची घटना घडली होती. ५ मे रोजी दुपारी बायकोच्या डोक्यात कोयत्याने वार करून जंगलात पसार झालेल्या नवºयाला नेरळ पोलिसांनी अडीच दिवसांत जंगलातून पकडून
आणले.
पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर आणि सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, पोलीस उपनिरीक्षक रतीलाल तडवी, सचिन सांगळे यांनी खून करून जंगलात पळून गेलेल्या योगेशचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दोन पथके तयार के ली. ही पथकेबोरगाव येथील जंगल पालथे घालत होती. योगेश हा पत्नीला ठार करून पळाल्याने तो आपल्या जीवाचे बरे-वाईट करील, अशी भीती पोलिसांना असल्याने नेरळ पोलिसांनी आपले खबरे सर्व ठिकाणी पाठवले होते. त्यानुसार ७ मे रोजी पोलिसांना खबऱ्यांकडून योगेश भला फोंडेवाडी येथे गावात येऊन जेऊन पुन्हा जंगलात गेला, अशी माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे नेरळ पोलीसठाण्याचे सहायक निरीक्षक सोमनाथ जाधव हे चिकणपाडा मार्गे तर पोलीस उपनिरीक्षक रतीलाल तडवी आणि सचिन सांगळे हे साळोख मार्गे फोंडेवाडी येथे खासगी वाहने घेऊन निघाले. सायंकाळी ६.३० च्या दरम्यान योगेशला जंगलात पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला रात्री नेरळ पोलीस ठाणे येथे आणून त्याची चौकशी सुरू केली. त्या चौकशीमध्ये योगश भला याने, तिने आपल्याला पैसे द्यावेत म्हणून कोयत्याने मारले, त्यात ठार मारण्याचा कोणताही हेतू नसल्याची कबुली दिली आहे.
नेरळ पोलीसठाण्यात योगेश भला विरुद्ध गुन्हा नोंद असून त्याला ७ मे रोजी रात्री ८.३० वाजता पत्नी भीमा योगेश भला (३२) यांच्या मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आली असून, सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव या खून प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.