'बंटी-बबली'ने 65 जणांना लावला चुना; एचडीएफसी बँकेचं दिलं बोगस पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 05:32 PM2018-10-30T17:32:33+5:302018-10-30T17:33:03+5:30

तुम्ही 'बंटी और बबली' चित्रपट पाहिला असेलच. या चित्रपटातील कथानकात ज्यापद्धतीने दाम्पत्य अनेक लोकांना लाखो रुपयांचा चुना लावते. अशाच प्रकारे एका दाम्पत्याने येथील तरुणांना चुना लावला आहे.

husband wife duped 65 people in the name of hdfc bank recruitment letter | 'बंटी-बबली'ने 65 जणांना लावला चुना; एचडीएफसी बँकेचं दिलं बोगस पत्र

'बंटी-बबली'ने 65 जणांना लावला चुना; एचडीएफसी बँकेचं दिलं बोगस पत्र

गुडगाव : तुम्ही 'बंटी और बबली' चित्रपट पाहिला असेलच. या चित्रपटातील कथानकात ज्यापद्धतीने दाम्पत्य अनेक लोकांना लाखो रुपयांचा चुना लावते. अशाच प्रकारे एका दाम्पत्याने येथील तरुणांना चुना लावला आहे. एचडीएफसी बँकेत नोकरी देतो, असे सांगून या दाम्पत्याने अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे.
या दाम्पत्याने आणखी एका साथीदाच्या मदतीने बेरोजगार तरुणांना गाठून एचडीएफसी बँकेत नोकरी लावण्याचे आमिष देऊन त्यांच्याकडून पैसे उकळले आहेत. एवढेच नाही तर या तरुणांना नोकरी लागल्याचे त्यांनी नियुक्तीपत्र देखील सुद्धा दिले. मात्र, बँकेत गेल्यानंतर ते पत्र बोगस असल्याचे समजले आणि बँकेत कोणत्याच प्रकारच्या नोकरीच्या संधी उपलब्ध नसल्याचे तरुणांना समजले. त्यानंतर हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे उघडकीस आले. दरम्यान, फसवणुक झालेल्या तरुणांनी या दाम्पत्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, दाम्पत्य पसार झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दाम्पत्याविरोधात तक्रार दाखल केली असून चौकशीला सुरुवात केली आहे. 
चौकशीत असे समजते की, या दाम्पत्याने गेल्या वर्षभरापासून अशाचप्रकारे तरुणांना गंडा घातला असल्याचे उघडकीस आले आहे. मार्च 2017 ते 2018 पर्यंत हा सर्व प्रकार सुरू होता. नोकरीसाठी 'सिक्युरिटी मनी'च्या नावाखाली एकूण 65 जणांकडून या दाम्पत्याने प्रत्येकी 25 ते 30 हजार रुपये उकळले आहेत. 
या दाम्पत्याचे नाव रोहित कुमार उर्फ अमित चौधरी आणि त्याची पत्नी कोमल कुशवाह असे आहे. तर, त्यांच्या साथीदाराचे नाव विशाल पांडे असून तो उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथील रहिवाशी आहे. तिघेही सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. 

Web Title: husband wife duped 65 people in the name of hdfc bank recruitment letter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.