नवरी सासरी गेली अन् बिथरली... जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा साऱ्यांनाच बसला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 07:10 PM2023-05-12T19:10:49+5:302023-05-12T19:11:29+5:30
लग्नाच्या मंडपातून नवरा-नवरी घरी पोहोचले आणि लगेचच...
Husband Wife News: तुम्ही लग्नाचे बरेच व्हिडिओ पाहिले असतील. पती-पत्नीच्या भांडणाचे व्हिडिओही सर्रास पाहायला मिळतात. पण उत्तर प्रदेशातील मथुरेच्या वृंदावनमधील एका प्रकरणाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. गौरा नगर येथील रहिवासी असलेल्या आनंद अग्रवालचे लग्न हरियाणातील होडल येथील रहिवासी लखन पाल यांची मुलगी रेखा हिच्याशी झाले होते. 10 मे रोजी मोठ्या थाटामाटात हा विवाह पार पडला. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 11 मे रोजी रेखा तिथून निघून सासरच्या घरी पोहोचली. मात्र तेथे पोहोचल्यानंतर वधूने काही विचित्रच गोष्टी करण्यास सुरूवात केल्याने साऱ्यांनाच धक्का बसला.
नक्की काय घडलं?
वृंदावनातील गौरानगरमध्ये राहणारा कौशल किशोर अग्रवाल हा मुलगा आनंदसाठी मुलगी शोधत होता. हरियाणातील होडल येथील रहिवासी लखन पाल यांची मुलगी रेखा हिच्याशी त्याचा विवाह जुळला. लग्नाची तारीख 10 मे ठरली होती. लग्नाची मिरवणूक मोठ्या थाटामाटात आली. लग्नाचे सर्व विधी पार पडले. तिथून निघून गेल्यावर रेखा तिच्या सासरच्या घरी आली. मात्र तेथे पोहोचल्यानंतर तिने गोंधळ सुरू केला. हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. प्रकरण वाढल्यावर वधूचा भाऊ विनोद याला बोलावण्यात आले. त्याने जे सांगितले ते कळल्यावर साऱ्यांना धक्काच बसला.
सत्य काय होतं?
वधू जेव्हा नवरदेवाच्या घरी पोहोचली तेव्हा तिने गोंधळ घालण्यास सुरुवात केली आणि अतिशय विचित्र वागू लागली. यानंतर हा प्रकार संपूर्ण परिसरात समजला आणि सर्वांनीच याबाबत चर्चा सुरू केली. वधूच्या अशा विचित्र गोष्टी पाहून वराच्या आजूबाजूचे लोकही आश्चर्यचकित झाले. त्यांनी तात्काळ वधूच्या कुटुंबीयांना बोलावून घेतले. त्यावेळी वधूचा भाऊ विनोदने सांगितले की, त्याची बहीण मानसिक रूग्ण आहे. त्यानंतर बराच वादंग माजला. प्रकरण वाढताच आनंदच्या कुटुंबीयांनी पोलिसांना कळवले.
नवरदेव आनंदच्या म्हणण्यानुसार, रेखाने त्याच्या कुटुंबातील सदस्यांना शिवीगाळ केली आणि तिला वेडाचे झटके आले. वधूची मानसिक स्थिती चांगली नसल्याचा आरोप वराच्या बाजूने करण्यात आला. तसेच, लग्नाच्या वेळी सत्य लपवून ठेवल्याचा आरोप त्यांना केला. याबाबत आनंदने पोलिसांना माहिती दिली. पोलीस आले आणि त्यांनी दोन्ही पक्षांना पोलीस ठाण्यात नेले. दोन्ही बाजूंमधली चर्चा बराच वेळ चालली. बऱ्याच प्रयत्नांनंतर दोन्ही पक्षांनी संबंध तोडण्यास सहमती दर्शवली.