धक्कादायक! प्लॅटफॉर्मवर झोपलेल्या पत्नीला उठवले अन् धावत्या एक्सप्रेससमोर ढकलले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 09:08 PM2022-08-22T21:08:18+5:302022-08-22T21:10:56+5:30

सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, वस‌ई रोड रेल्वे स्थानकावर रविवारी रात्री एक जोडपे आपल्या दोन लहान मुलांसह प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर झोपले होते.

Husband woke up his wife who was sleeping on the platform and pushed her in front of the running express | धक्कादायक! प्लॅटफॉर्मवर झोपलेल्या पत्नीला उठवले अन् धावत्या एक्सप्रेससमोर ढकलले

धक्कादायक! प्लॅटफॉर्मवर झोपलेल्या पत्नीला उठवले अन् धावत्या एक्सप्रेससमोर ढकलले

Next

मंगेश कराळे

नालासोपारा - रेल्वे स्थानकावरती दोन लहान मुलांसह गाढ झोपलेल्या पत्नीला उठवून थेट भरधाव एक्सप्रेसच्या ट्रेनखाली ढकलून ठार मारण्याचा प्रकार वस‌ई रोड रेल्वे स्थानकात सोमवारी पहाटे घडला आहे. अंगावर शहारा आणणारा हा सर्व प्रकार रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेनंतर आरोपीने पती आपल्या दोन लहान मुलांसह घटनास्थळावरून पळ काढला असुन वस‌ई लोहमार्ग पोलीस आता त्याचा शोध घेत आहेत.

वस‌ई रोड रेल्वे स्थानकावर रविवारी रात्री एक जोडपे आपल्या दोन लहान मुलांसह प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर झोपले होते. सोमवारी पहाटे चारच्या दरम्यान अवध एक्सप्रेस येण्याअगोदर झोपी गेलेल्या आपल्या पत्नीला त्याने उठवले व एक्स्प्रेस स्थानकात दाखल होतात त्याने तिला ट्रॅकवर ढकलून दिले. त्यानंतर आरोपी पती आपल्या दोन्ही लहान मुलांना घेऊन तिथून पळून गेला. या घटनेनंतर वसई लोहमार्ग पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता ही धक्कादायक घटना उघडकीस आली. त्यानंतर एक्सप्रेसच्या लोको पायलटचा जबाब घेऊन सदर आरोपीचा शोध सुरू केला. यादरम्यान आरोपी लोकलने दादर व तिथून कल्याणपर्यंत गेल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी आता आरोपी पतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर घटना सीसीटीव्हीत कैद झालेली असून ते पाहिल्यावर हा थरारक प्रकार उघड झाला आहे. आरोपी पतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. अद्याप महिलेची ओळख पटली नसून फरार आरोपीचा शोध घेत आहे. - गणपत तुंबडा (पोलीस निरीक्षक, वसई रेल्वे)

Web Title: Husband woke up his wife who was sleeping on the platform and pushed her in front of the running express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.