पती परदेशात, घरी मित्रांना पाठवायचा; पत्नीला शरीर संबंध ठेवायला लावायचा, लाईव्ह पहायचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 11:42 IST2025-01-10T11:42:21+5:302025-01-10T11:42:34+5:30
या महिलेने आपल्यावरील आपबीती पोलिसांना सांगितली तेव्हा महिला पोलिसांच्या अंगावर शहारे आले होते.

पती परदेशात, घरी मित्रांना पाठवायचा; पत्नीला शरीर संबंध ठेवायला लावायचा, लाईव्ह पहायचा
उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीवर मित्रांना बलात्कार करण्यास लावून ते व्हिडीओ कॉलवर पाहण्याची विकृती एका पतीला लागली होती. जेव्हा या महिलेने आपल्यावरील आपबीती पोलिसांना सांगितली तेव्हा महिला पोलिसांच्या अंगावर शहारे आले होते.
महिलेवर मित्रांकडून रेप करायला लावलेले व्हिडीओ दाखवून तो तिला ब्लॅकमेलही करत आहे. हे व्हिडीओ दाखवून नराधम पती तिला पुन्हा तसे करण्यास भाग पाडत आहे. वैतागलेल्या पत्नीने पोलीस ठाणे गाठले असून कारवाईची मागणी केली आहे.
पीडित महिलेचे लग्न गुलावती परिसरातील एका तरुणाशी झाले होते. विवाहित महिलेला चार मुले आहेत. नवरा तीन महिन्यांपूर्वी परदेशातून परतला आहे. पतीने तलाक देण्याची धमकी दिली होती. तलाक नको असेल तर त्याच्या मित्रांशी तिला संबंध ठेवावे लागतील असे सांगितले होते. तलाक नको असल्याने आपल्याला तसे करणे भाग पडत होते, असे या महिलेने पोलिसांना सांगितले आहे.
पती परदेशात होता. त्याचे दोन मित्र आळीपाळीने गेली तीन वर्षे तिचा उपभोग घेत होते. पती परदेशातून व्हिडीओ कॉलवर हे पाहत असायचा. याचे व्हिडीओही त्याने बनविले होते. पती व्हॉट्सअप कॉलवर हे सर्व करत होता. मित्र आला की त्याच्यासोबत शरीरसंबंध ठेवण्यास सांगत असायचा, व ते लाईव्ह पाहत असायचा. मी नकार दिला तर तलाक देण्याची धमकी द्यायचा, असे या पीडितेने म्हटले आहे.