मोबाईलवरून तिहेरी तलाक देणाऱ्या पतीस पोलिसांनी ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 02:49 PM2020-08-28T14:49:45+5:302020-08-28T14:50:25+5:30
मिळालेल्या माहितीनुसार आझादनगर येथील पीडित 21 वर्षीय महिलेचा चार वर्षांपूर्वी आरोपी सुभान खान याच्यासोबत मुस्लिम धार्मिक रितीरिवाजाप्रमाणे निकाह झाला होता.
भिवंडी - माहेरून गाडीसाठी पैशांचा तगादा लावून पिसे न मिळाल्याने पतीने पत्नीला मोबाईलवरून तिहेरी 'तलाक' देणाऱ्या पती विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात तिहेरी तलाक कायद्याअंतर्गत पीडित पत्नीने गुन्हा दाखल केल्याची घटना गुरुवारी समोर आली आहे. सुभान आजम खान ( रा. समरुबाग) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. त्यास शांतीनगर पोलिसांनीअटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आझादनगर येथील पीडित 21 वर्षीय महिलेचा चार वर्षांपूर्वी आरोपी सुभान खान याच्यासोबत मुस्लिम धार्मिक रितीरिवाजाप्रमाणे निकाह झाला होता. मात्र लग्नाच्या काही दिवसानंतर पीडित पत्नीला पती व तिची नणंद हुस्नतारा हि शिवीगाळ करून मारझोड करीत होते. तर आरोपी पती सुभान हा तिच्या चारित्र्यावर संशयही घेत असे, मात्र एवढा त्राससहन केल्यानंतर ही पीडित महिलेने चार वर्ष आपला संसार टिकवून ठेवला होता. परंतु तलाक देण्याआदी आरोपी सुभानने मोटरसायकल घेण्यासाठी माहेरवरून पैसे घेऊन ये असा पत्नीकडे तगादा लावला होता. ते न देऊ शकल्याने पीडित पत्नीला नणंद आणि पतीने बेदम मारहाण करून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. शिवाय 24 ऑगस्ट रोजी रात्री 11 च्या सुमाराला तिच्या मोबाईलवर संपर्क करून तिला शिवीगाळ करीत मोबाईल वरूनच तिला तिहेरी तलाक देऊन तलाक झाल्याचं सांगितले , यांनतर पीडित पत्नीने न्यायाची अपेक्षा करत शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली असता शांतीनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 498 A, 323, 504 प्रमाणे मुस्लिम महिला विवाह हक्क सरंक्षण कायद्या अंतर्गत कलम 4 नुसार तिहेरी तलाकचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या अधिक तपास पोलीस हवलदार आर.आर. चौधरी करीत आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मोठी बातमी! महाड तालुक्यात पाच मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती
पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल
चिमुकल्या मुलींसह आईने स्वत:ला संपविले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील दुर्घटना
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस बॅकफूटवर; जाणून घ्या, सीबीआय कसा करणार तपास?
पैसे चोरल्याच्या वादातून कामगाराची हत्या, पानटपरी चालकाला अटक