प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 05:40 AM2022-01-09T05:40:33+5:302022-01-09T05:40:39+5:30

भिवंडीतील घटना : मृतदेहाच्या शर्टावरील टेलर मार्कवरून हत्येचा छडा

Husband's murder with the help of lover | प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा

प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरत असल्याने चार मुलांची आई असलेल्या महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याची धक्कादायक घटना भिवंडीत उघड झाली आहे. गावठी औषध घेण्याच्या बहाण्याने आडवाटेवर जंगलात नेऊन पतीची हत्या घडवून आणली. तसेच मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून त्याचा चेहरा विद्रूप करण्यात आला. मात्र, शर्टावरील टेलर मार्कवरून मृतदेहाची ओळख पटवून पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या मुसक्या आवळण्यात आल्या. सलाउद्दीन मोहम्मद युसूफ (वय ४२) असे मृताचे नाव आहे.

 भिवंडी तालुका पोलीस ठाणे हद्दीत ४ जानेवारीला खारबाव रेल्वे स्टेशन परिसरातील जंगलात एका व्यक्तीचा मृतदेह गळा चिरलेल्या तसेच चेहरा विद्रूप केलेल्या अवस्थेत आढळला हाेता. गणेशपुरी विभाग पोलीस उपअधीक्षक विकास नाईक यांनी तपासाची सूत्रे हाती घेत मृतदेहाच्या शर्टावरील टेलर मार्कवरून भिवंडीतील टेलरचा शोध घेतला. हा टेलर बागे फिरदाेस येथे  आढळून आला. त्याच्या मदतीने शर्टाची व त्यानंतर मृतदेहाची ओळख पटून त्याचे नाव सलाउद्दीन असल्याचे निष्पन्न झाले. 

पाेलिसांनी त्याच्या नातेवाइकांचा शाेध घेतला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच इमारतीत राहणारा असजद अन्सारी (वय ३२) हा दफनविधीला उपस्थित नसल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलिसांची संशयाची सुई त्याच्याकडे वळली. मात्र ताे आधीच पसार झाला हाेता. अखेर नारपोली परिसरातून त्याला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली. या प्रकरणी अधिक तपास 
सुरु आहे.

दोन दिवसांत आरोपी गजाआड
nअनैतिक संबंधातून ३८ वर्षीय  महिलेसाेबत कट रचून सलाउद्दीनची हत्या केल्याचे सांगितले. आराेपी महिलेने सलाउद्दीनला एका निर्जनस्थळी नेऊन तेथे आधीच हजर असलेल्या असजद याने धारदार शस्त्राने त्याची हत्या केली. त्यानंतर त्याचा चेहरा दगडाने ठेचून विद्रूप करण्यात आला. 
nभिवंडी तालुका ठाण्याचे पोलीस उपअधीक्षक विकास नाईक यांच्या नेतृत्वाखाली अवघ्या दोन दिवसांत आरोपींना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना १४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.
 

Web Title: Husband's murder with the help of lover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.