पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या : सणसवाडीतील धक्कादायक घटना 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 08:16 PM2019-07-19T20:16:43+5:302019-07-19T20:16:58+5:30

पती-पत्नीत किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाचा राग धरून पत्नीला मुलीसह एका डोंगरावर नेत डोक्यात दगड पत्नीचा घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Husband's suicide by wife's murder: Shocking events in Sanaswadi | पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या : सणसवाडीतील धक्कादायक घटना 

पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या : सणसवाडीतील धक्कादायक घटना 

Next
ठळक मुद्देसकाळीही पत्नीसह मुलीवर ओतले होते डिझेल

कोरेगाव भीमा:  सणसवाडी (ता. शिरूर) येथील पती-पत्नीत किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाचा राग धरून पत्नीला मुलीसह एका डोंगरावर नेत पत्नीचा डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि १९) घडली. खुनानंतर पत्नीच्याच साडीने स्वत: गळफास घेऊन पतीनेही आत्महत्या केली.  
     उर्मिला संतोष बच्चेवार (रा. सणसवाडी, ता. शिरूर जि. पुणे मूळ. चांडोळा ता. नांदेड जि. नांदेड) असे खुन झालेल्या पत्नीचे नाव असून संतोष बच्चेवार असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे.  या घटनेची माहिती दांपत्यांची मुलगी कोमल संतोष बच्चेवार (वय ९)  ने पोलिसांना दिली.  
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष बच्चेवार यांनी पाबळ भागातील एका महिलेला उसने तीन लाख रुपये आणि संतोष यांची पत्नी उर्मिला हिचे काही दागिने दिले  होते. त्यांनतर दोघेही त्या महिलेकडे पैसे व सोने परत देण्याची मागणी करत होते. मात्र, ती महिला  त्यांना पैसे देत नव्हती. या कारणावरून संतोष आणि उर्मिला यांच्यात वारंवार वाद होत होते.  बुधवारी (दि १७)   संतोष हे त्यांच्या पत्नीसह त्या महिलेच्या घरी गेले असताना त्यांचे त्या महिलेबरोबर वाद झाले. यामुळे त्या महिलेने संतोष यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात येथे तक्रार दिली होती. त्यांनतर दुस-या दिवशी पुन्हा गेले असता त्या महिलेने त्यांना एक लाख रुपये परत दिले. 
     शुक्रवारी (दि १९) संतोष हा उर्मिलासह पुन्हा त्या महिलेच्या घरी गेला. मात्र, त्या  महिलेने त्यांना पैसे दिले नाहीत. यामुळे   संतोषने त्या महिलेविरूद्ध पाबळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या नंतर दोघा पती पत्नीमध्ये वाद झाला. ते दोघेही सणसवाडी येथे येत असताना संतोष यांनी दुचाकीला बांधलेल्या डीझेलच्या कॅन मधील डीझेल स्वत:च्या तसेच पत्नीच्या व मुलीच्या अंगावर ओतले. परंतु तेव्हा डिझेलमुळे अंगाची आग होऊ लागल्याने त्यांनी पेटवून घेतले नाही.  त्यानंतर सणसवाडी जवळ एका डोंगरावर आले असताना संतोष यांनी पत्नी व मुलीला डोंगरावर नेले व मुलीला म्हणाले, तुझी मम्मी आणि मी खोटी खोटी आत्महत्या करतो. तू पोलिसांना सांग. मग पोलीस त्या बाईकडून आपले पैसे काढून देतील. त्यावेळी मुलगी कोमल डोंगर उतरून खाली येत असताना तिला तिच्या आईच्या ओरडण्याच्या आवाज आला. तिने पाठीमागे पाहिले असताना तिला तिचे पप्पा साडी घेऊन जाताना दिसले. कोमल ही पळत डोंगरावरून खाली आली. तिने यावेळी एका कामगाराकडून पैसे घेत पोलीस ठाणे गाठले. माझे मम्मी पप्पा डोंगरावर आत्महत्या करणार आहेत, असे पोलिसांना सांगताच पोलीस देखील गोंधळून गेले. पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी याची तातडीने दखल घेत कर्मचा-यांना सणसवाडी येथील डोंगरावर धाव घेतली. यावेळी त्यांना डोंगराच्यावर संतोष यांची पत्नी मृत्युमुखी पडलेली दिसली.  तसेच त्यापासून काही अंतरावर संतोष हा एका झाडाला साडीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. 
घटनेची माहिती मिळताच दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी डो. सचिन बारी यांनी घटनास्थळी भेट दिली असून शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस करत आहे.
चौकट
कामगाराकडून उसने पैसे घेऊन चिमुकल्या कोमले गाठले पोलीस स्टेशन
संतोष आणि उर्मिला मुलीसह सणसवाडी येथील एका डोंगरावर गेले. यावेळी संतोषने कोमलला आम्ही खोटी आत्महत्या करत असल्याचे सांगत तू ही गोष्ट पोलीसांना कळव असे सांगत डोंगराखाली पाठवले. काही वेळाने तीला तीच्य आईच्या ओरडण्याचा आवाज आला. तीने पळत डोंगरा खाली येत एका कामगाराकडून २० रूपये उसने घेतले आणि पोलीस ठाणे गाठले आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला. 

----------------------


 
 

Web Title: Husband's suicide by wife's murder: Shocking events in Sanaswadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.