लग्नाची लगबग, पाहुण्यांची गडबड; संधी साधून चोरट्यांनी दागिन्यांवर मारला डल्ला, चोरटे CCTVत कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 10:44 AM2021-12-07T10:44:26+5:302021-12-07T10:45:33+5:30
Crime News: मीरारोडच्या जीसीसी क्लब मधील एका लग्न समारंभातून ६४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे ब्रेसलेट चोरीला गेले असून सीसीटीव्ही मध्ये दोन चोरटे आढळून आले आहेत .
मीरारोड - मीरारोडच्या जीसीसी क्लब मधील एका लग्न समारंभातून ६४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे ब्रेसलेट चोरीला गेले असून सीसीटीव्ही मध्ये दोन चोरटे आढळून आले आहेत .
कांदिवलीच्या महावीर नगर मध्ये राहणारे आझादकुमार मांगीलाल जैन उन्ची मुलगी मेघना हिचे मीरारोडच्या ग्रीन कोर्ट क्लब मधील एका सभागृहात लग्न होते . लग्नाच्या अगोदरच्या संमारंभा (मायरा) करिता वधू पक्षा कडील पाहुण्यासह ३० ते ३५ पाहुणे आले होते . मायरा करीता लागणारे सोने,अंगठी,चैन व एक ब्रेसलेट हे एका लाकडी थाळी मध्ये तर दुस-या लाकडी थाळी मध्ये कपडे होते. सदर दोन्ही थाळ्यावर कपडा झाकुन हॉलच्या मंडपात ठेवल्या होत्या.
विधी पुर्ण झाल्यानंतर रितीरीवाजाप्रमाणे आणलेले दागिने व कपडे देण्याचा कार्यक्रम सुरु झाला. पुजारीने ते दागिने व कपडे देण्याकरीता मागितले असता मेव्हणा निरंजन सेठ यांनी थाळीवरील कपडा काढून पहिले असता दागिन्यां मध्ये सोन्याचे ब्रेसलेट दिसुन आले नाही. ब्रेसलेटचा मंडप व सभागृहात शोध घेतला असता ते सापडले नाही. हॉलचे व्यवस्थापक भानुप्रताप सिंग यांनी सीसीटिव्ही फुटेज तपासले असता फुटेज मध्ये एक दोघे अनोळखी इसम हे संमारंभ मंडपात वावरत असताना दिसून आले . त्या नंतर सिंग यांनी पोलिसांना पाचारण केले . या प्रकरणी रविवारी काशीमीरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .