Hyderabad Encounter: 'त्या' चौघांचे मृतदेह घ्यायलाही कुटुंबीय तयार नाहीत!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2019 06:03 PM2019-12-06T18:03:43+5:302019-12-06T18:07:03+5:30

पोलिसच करणार आरोपींचे अंत्यसंस्कार

Hyderabad Encounter: Family members are not ready to take the bodies of those four accused! | Hyderabad Encounter: 'त्या' चौघांचे मृतदेह घ्यायलाही कुटुंबीय तयार नाहीत!

Hyderabad Encounter: 'त्या' चौघांचे मृतदेह घ्यायलाही कुटुंबीय तयार नाहीत!

Next
ठळक मुद्दे मृत आरोपींची डीएनए चाचणी करण्यात आली.आरोपींचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांनी स्वीकारण्यास नकार दिला आहे.

हैदराबाद -  हैदराबादमधील पशुवैद्यक तरुणीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा आज पहाटे ५.३० वाजता  एन्काऊंटर करण्यात आला आहे. या आरोपींची नावे  मोहम्मद आरिफ, नवीन, शिवा आणि चेन्नाकेशवुलु अशी होती. त्यांना पशुवैद्यकीय डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना तेलंगाणामधील शादनगर दंडाधिकाऱ्यांनी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत सुनावली होती. या प्रकरणाचा घटनाक्रम जाणून घेण्यासाठी पोलिसांनी मध्यरात्री आरोपींना घटनास्थळी जिथे सामूहिक बलात्कार करण्यात आला तेथे नेले होते असल्याची माहिती सायबराबादचे आयुक्त सज्जनार यांनी दिली. मात्र, पोलिसांच्या बंदुका हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांचा तेलंगणा पोलिसांनी एन्काउंटर करून खात्मा केला. त्यानंतर थोड्यावेळ पूर्वी त्यांचे मृतदेह घटनास्थळाहून हलविण्यात आले. त्याआधी मृत आरोपींची डीएनए चाचणी करण्यात आली. मात्र, आरोपींचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांनी स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता तेलंगणा पोलिसच आरोपींचे अंत्यसंस्कार करणार आहेत, अशी माहिती आजतकने दिली आहे. 
 
२७ नोव्हेंबर बुधवारी रात्री रुग्णालयातून घरी जात असताना महिलेच्या गाडीचा टायर पंक्चर झाल्यामुळे त्या महामार्गावरील टोल प्लाझाजवळ थांबल्या होत्या. तेव्हा चार आरोपींनी महिलेवर बलात्कार करून हत्या केली होती. तसेच त्यांचा मृतदेह जाळला होता. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी २४ तासांच्या आत आरोपींना अटक केली होती. त्यानंतर आरोपींच्या नातेवाईकांना द क्यून्टशी बोलताना ही मुलं आमच्यासाठी मेली असल्याची प्रतिक्रिया दिली होती. आरोपी जोल्लू शिवाचे वडील जोल्लू राजप्पा यांनी असल्या मुलगा कशाला पाहिजे अशी प्रतिक्रिया नोंदवली होती. तर जोल्लू नवीनची आई लक्ष्मी यांनी माझा मुलगा नाकारला असून चेन्नाकेशवुलुची जयम्मा यांनी चेन्नाकेशवुलुने चुकी केलीय त्याला कठोर शिक्षा करा असे सांगितले होते. 

Web Title: Hyderabad Encounter: Family members are not ready to take the bodies of those four accused!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.