Hyderabad Encounter : हैदराबाद एन्काउंटरविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 04:47 PM2019-12-07T16:47:22+5:302019-12-07T16:48:49+5:30

या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी होणार आहे.

Hyderabad Encounter: Petition filed in Supreme Court against Hyderabad encounter | Hyderabad Encounter : हैदराबाद एन्काउंटरविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

Hyderabad Encounter : हैदराबाद एन्काउंटरविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

Next
ठळक मुद्देहैदराबाद एन्काउंटरवर आक्षेप घेत वकील सी.एस. मणी आणि प्रदीप कुमार यादव यांनी सुप्रीम कोर्टाचा या एन्काउंटरविरोधात दाद मागितली आहे.या एन्काउंटरमध्ये सहभागी असलेल्या पोलिसांविरोधात एफआयआर करण्याची गरज असून त्यांच्यावर कारवाई करावी 

नवी दिल्ली - हैदराबादमधील पशुवैद्यकीय डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्यानंतर अटकेत असलेल्या चारही आरोपींना शुक्रवारी पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी एन्काउंटर करून ठार केले. तेलंगणा पोलिसांच्या या कारवाईचे देशभरातून खूप कौतुक झाले. मात्र, पोलिसांच्या या कारवाईवर काहींनी प्रश्न उपस्थित केला. पोलिसांनी केलेल्या या एन्काउंटरविरोधात आज सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी भल्या पहाटेच पोलीस चारही आरोपींना घेऊन घटनास्थळी गेले होते. तेथून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना चौघांनाही गोळ्या घालण्यात आल्याच आणि पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी आरोपींवर गोळ्या झाडल्या असा पोलिसांचा दावा आहे.

हैदराबाद एन्काउंटरवर आक्षेप घेत वकील सी.एस. मणी आणि प्रदीप कुमार यादव यांनी सुप्रीम कोर्टाचा या एन्काउंटरविरोधात दाद मागितली आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी कोर्टाने २०१४ साली दिलेल्या निर्देशांचे पालन केलेले नाही असे या याचिकाकर्त्यांनी कोर्टात याचिकेत म्हटले आहे. या एन्काउंटरमध्ये सहभागी असलेल्या पोलिसांविरोधात एफआयआर करण्याची गरज असून त्यांच्यावर कारवाई करावी असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी होणार आहे.

Web Title: Hyderabad Encounter: Petition filed in Supreme Court against Hyderabad encounter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.