'विवाहबाह्य संबंधांची माहिती घरच्यांना सांगू' अशी धमकी देत शेजाऱ्यांचा महिलेवर सामूहिक बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2021 16:45 IST2021-12-19T16:29:56+5:302021-12-19T16:45:27+5:30

Crime News : विवाहबाह्य संबंधांविषयी घरच्यांना सांगू अशी धमकी देत दोन आरोपींनी एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

hyderabad gangrape woman gangraped by two neighbors threatening to expose extra marital affair | 'विवाहबाह्य संबंधांची माहिती घरच्यांना सांगू' अशी धमकी देत शेजाऱ्यांचा महिलेवर सामूहिक बलात्कार

'विवाहबाह्य संबंधांची माहिती घरच्यांना सांगू' अशी धमकी देत शेजाऱ्यांचा महिलेवर सामूहिक बलात्कार

नवी दिल्ली - देशात एक धक्कादायक घटना घडली आहे. विवाहबाह्य संबंधांविषयी घरच्यांना सांगू अशी धमकी देत दोन आरोपींनी एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तेलंगणातील हैदराबादमध्ये संतापजनक घटना घडली. खळबळजनक बाब म्हणजे पीडित महिला आणि तिचा प्रियकर यांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर हे प्रकरण उघड झालं आहे. बांधकाम कामगार असलेल्या या महिलेला त्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या चौकशीत तिच्यावर अत्याचार झाल्याचं समोर आलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एस. आर. नगर येथे घडली आहे. पीडित बांधकाम कामगार महिलेचे तिच्या एका सहकाऱ्यासोबत विवाहबाह्य संबंध होते. ती 13 डिसेंबरला आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी जात होती. त्यावेळी दोन व्यक्तींनी तिला पकडलं आणि तिच्या प्रेमप्रकरणाविषयी घरच्यांना सांगू अशी धमकी दिली. आरोपींनी महिलेला एका निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला, असं पोलीस तक्रारीत म्हटलं आहे.

आरोपींनी अत्याचार केल्यानंतर 14 डिसेंबरला पीडित महिलेने आपल्या प्रियकरासोबत विकाराबाद जिल्ह्यातील एका निर्जनस्थळी जाऊन तेथे किटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिच्या प्रियकराने बेशुद्ध होण्याआधी घरच्यांना फोन केला आणि या परिस्थितीची माहिती दिली. यानंतर दोघांनाही तात्काळ रूग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. पीडित महिलेने शुद्धीवर आल्यावर पोलिसांना दिलेल्या जबाबात सामूहिक बलात्कार झाल्याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करत दोन आरोपींना अटक केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: hyderabad gangrape woman gangraped by two neighbors threatening to expose extra marital affair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.