भयंकर! पत्नीला पेट्रोल टाकून जाळलं अन् कुटुंबाला कोरोनाने मृत्यू झाल्याचं खोटं सांगितलं; असा झाला उलगडा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 02:26 PM2021-06-29T14:26:55+5:302021-06-29T14:36:37+5:30
Crime News : मृतदेह जळालेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटवणंही अशक्य होतं. मात्र पोलिसांनी रुग्णालय परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीने सुटकेस टाकण्यासाठी मदत घेतलेल्या टॅक्सीचा शोध घेतला आणि या भयंकर प्रकरणाचा उलगडा केला आहे.
देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही तीन कोटींच्या वर गेली आहे. तर कोरोनामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. देशात कोरोनाच्या डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटने थैमान घातले आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. कोरोनाच्या डेल्टा प्लसचं खोटं कारण सांगून एका पतीने आपल्य़ा पत्नीचा जीव घेतला आहे. पाच दिवसांपूर्वी एका सुटकेसमध्ये सापडलेल्या अज्ञात मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना आता यश आलं आहे. एसव्हीआआर या सरकारी रुग्णालयाच्या शेजारी जळलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळला होता. हा मृतदेह हैदराबादमधील एका 27 वर्षीय तरुणीचा आहे.
पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. यामध्ये महिलेचा पती मुख्य संशयित असून हत्या करुन तो फरार झाल्याचा अंदाज आहे. मृतदेह जळालेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटवणंही अशक्य होतं. मात्र पोलिसांनी रुग्णालय परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीने सुटकेस टाकण्यासाठी मदत घेतलेल्या टॅक्सीचा शोध घेतला आणि या भयंकर प्रकरणाचा उलगडा केला आहे. पोलिसांनी टॅक्सी चालकाकडे चौकशी केली असता त्याने पीडित तरुणीचं नाव भुवनेश्वरी असून ती चित्तूरची रहिवासी असल्याची माहिती मिळाली. सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारी तरुणी हैदराबाद येथे कामाला होती.
भयंकर! कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून एकाच कुटुंबातील 6 जणांची आत्महत्या, घटनेने खळबळ#Crime#Suicide#Policehttps://t.co/P3Bqdduz3S
— Lokmat (@MiLOKMAT) June 28, 2021
2019 मध्ये श्रीकांत रेड्डी यांच्यासोबत तिचं लग्न झालं होतं. त्यांना दीड वर्षांची एक मुलगी देखील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या या संकटात श्रीकांतची नोकरी गेल्यानंतर दांपत्य तिरुपतीमध्ये राहण्यास आलं. नोकरी गेल्याने त्रस्त असलेल्या श्रीकांतने मद्यपानास सुरुवात केली होती ज्यामुळे दांपत्यामध्ये रोज भांडण होत होतं. 22-23 जूनच्या रात्रीदेखील दोघांमध्ये भांडण झालं आणि यावेळी श्रीकांतने भुवनेश्वरीची हत्या केली. त्याने टॅक्सीच्या सहाय्याने मृतदेह लपवलेली सुटकेस रुग्णालयाच्या कंपाऊंडमध्ये टाकून दिली. यानंतर रात्री तो पुन्हा आला आणि पेट्रोल टाकून सुटकेसला आग लावली.
एक हजाराहून अधिक लोकांच्या बँक खात्यातून आरोपींनी काढून घेतले कोट्यवधी रुपये #BJP#SakshiMaharaj#crime#Police#Bankhttps://t.co/AXjkSxWImt
— Lokmat (@MiLOKMAT) June 28, 2021
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांतने आपल्या कुटुंबाला आणि सासरच्यांना डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे पत्नीचा मृत्यू झाल्याची खोटी माहिती दिली होती. रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनीच मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्याचंही त्याने सांगितलं होतं. मात्र पोलिसांनी तपास करत टॅक्सी चालकाच्या सहाय्याने गुन्ह्याचा उलगडा केला आहे. दरम्यान पोलिसांनी फरार श्रीकांतला अटक करण्यासाठी विशेष पथकं तयार केली आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
धक्कादायक! आई व मुलीसह 3 जणांना गमवावा लागला जीव; आरोग्य विभागाचा कर्मचारी असल्याचं खोटं सांगून दिलं विष#coronavirus#Crime#crimesnews#Police#deathhttps://t.co/oQtI5jk4Xp
— Lokmat (@MiLOKMAT) June 28, 2021