हैदराबाद बलात्कार; चौथ्या आरोपीला अटक; गुन्ह्यात सामील पाचही जणांची ओळख पटली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 05:52 AM2022-06-06T05:52:18+5:302022-06-06T05:52:48+5:30

Hyderabad rape case : आरोपींपैकी एक जण मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) या पक्षाच्या नेत्याचा मुलगा आहे.

Hyderabad rape case; Fourth accused arrested; All the five people involved in the crime were identified | हैदराबाद बलात्कार; चौथ्या आरोपीला अटक; गुन्ह्यात सामील पाचही जणांची ओळख पटली

हैदराबाद बलात्कार; चौथ्या आरोपीला अटक; गुन्ह्यात सामील पाचही जणांची ओळख पटली

Next

हैदराबाद : एका मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी पोलिसांनी चवथ्या आरोपीलाही पोलिसांनी अटक केली असून, तो अल्पवयीन आहे. पाचही आरोपींची सीसीटीव्हीच्या फुटेजद्वारे ओळख पटविण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींपैकी एक जण मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) या पक्षाच्या नेत्याचा मुलगा आहे.

गेल्या २८ मे रोजी हैदराबाद येथे एका पार्टीहून घरी परतणाऱ्या १७ वर्षे वयाच्या एका अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. एका कारमध्ये हे अतिशय घृणास्पद कृत्य करण्यात आले. तुला घरी सोडतो, असे सांगून त्या मुलीला आरोपींनी आपल्या कारमध्ये बसविले. त्यानंतर, काही वेळाने तिला कारमध्ये मारहाण करण्यात आली व सामूहिक बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर, आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. 

बलात्काराची घटना घडल्यानंतर तीन दिवसांनी गुन्हा नोंदविण्यात आला. इतक्या उशिरा का गुन्हा दाखल केला, याचे स्पष्टीकरण राष्ट्रीय बाल हक्क रक्षण आयोगाने हैदराबाद पोलिसांकडे मागितले आहे. सामूहिक बलात्काराची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी भाजप व काँग्रेसने केली आहे. तेलंगणाचे राज्यपाल तामिलीसाई सुंदरराजन यांनी या प्रकरणाबद्दल राज्याचे मुख्य सचिव व पोलीस महासंचालकांकडून दोन दिवसांत सविस्तर अहवाल मागविला आहे. (वृत्तसंस्था)

भाजप आमदाराने टाकली व्हिडीओ व छायाचित्रे
अल्पवयीन मुलीवर ज्या कारमध्ये बलात्कार झाला, त्यावेळी एआयएमआयएमच्या एका आमदाराचा मुलगा तिथे उपस्थित होता, असा आरोप भाजपचे आमदार रघुनंदन राव यांनी करून, एक व्हिडीओ क्लिप व काही छायाचित्रे सोशल मीडियावर झळकावली आहे. 
त्यात दिसणारी व्यक्ती ही एआयएमआयएमच्या आमदाराचा मुलगा आहे, असा दावा रघुनंदन राव यांनी केला. त्या आमदाराचा मुलगा गुन्हा घडलेल्या ठिकाणी नव्हता, असे पोलिसांनी सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा व्हिडीओ व छायाचित्रे भाजप आमदार रघुनंदन राव यांनी सोशल मीडियावर झळकवली. 

Web Title: Hyderabad rape case; Fourth accused arrested; All the five people involved in the crime were identified

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.