हैदराबादमधील महिलेची लंडनमध्ये हत्या, मारेकरी ब्राझीलचा, एकाच फ्लॅटमध्ये राहत होते

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 06:34 PM2023-06-14T18:34:19+5:302023-06-14T18:34:45+5:30

रुग्णवाहिका सेवेला सकाळी ९.५९ वाजता दोन महिलांवर चाकूने हल्ला झाल्याचा फोन आला.

hyderabad woman kontham tejasvini murdered london brazilian man | हैदराबादमधील महिलेची लंडनमध्ये हत्या, मारेकरी ब्राझीलचा, एकाच फ्लॅटमध्ये राहत होते

हैदराबादमधील महिलेची लंडनमध्ये हत्या, मारेकरी ब्राझीलचा, एकाच फ्लॅटमध्ये राहत होते

googlenewsNext

लंडनमधील वेम्बली येथील नील क्रिसेंटमध्ये हैदराबादमधील २७ वर्षीय महिलेची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव कोंथम तेजस्विनी असे आहे. याच फ्लॅटमध्ये राहणाऱ्या आरोपींनी महिलेवर हल्ला केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

वरातीत नाचल्याने पत्नीला पट्ट्याने मारहाण; तिघांवर गुन्हा

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी आणखी एका २८ वर्षीय महिलेवरही चाकूने हल्ला केला. या महिलेला गंभीर दुखापत झाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून  रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. लंडन मेट्रोपॉलिटन पोलिसांनी ही घटना १३ जून रोजी घडल्याचे सांगितले आहे.

पोलीस आले तेव्हा दोन्ही महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. लंडन रुग्णवाहिका सेवेला सकाळी ९.५९ वाजता दोन महिलांवर चाकूने हल्ला झाल्याचा फोन आला. दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता तेजस्विनीचा जागीच मृत्यू झाल्याचे आढळून आले. तर दुसरी महिला श्वास घेत होती. यावरून पोलिसांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

या घटनेनंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी नंतर आणखी एका व्यक्तीचा फोटो जारी करुन त्याचा शोध सुरी केला आहे. बरीच चौकशी केल्यानंतर अखेर पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी एका पुरुष आणि महिलेला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले आहे. हल्ला करणारी व्यक्ती एकाच फ्लॅटमधील एका खोलीत राहत होते. मात्र, या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: hyderabad woman kontham tejasvini murdered london brazilian man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.