मी पोलीस आहे, कायदा मलाही कळतो, महिलेने पोलीस ठाण्यातच घातला गोंधळ, अखेर...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 07:26 PM2022-05-11T19:26:35+5:302022-05-11T19:27:06+5:30

Bogus Police Arrested : तोतया पोलीस बनलेल्या २७ वर्षीय महिलेचं नाव कविता प्रकाश दोडके असं आहे.

I am a policeman, I know the law too, the woman made a mess in the police station, finally ... | मी पोलीस आहे, कायदा मलाही कळतो, महिलेने पोलीस ठाण्यातच घातला गोंधळ, अखेर...

मी पोलीस आहे, कायदा मलाही कळतो, महिलेने पोलीस ठाण्यातच घातला गोंधळ, अखेर...

googlenewsNext

स्वतःच्या फायद्यासाठी किंवा आपला दबदबा निर्माण करण्यासाठी अनेकजण पोलीस अथवा मोठा अधिकारी असल्याचा बनाव करून फसवणूक करत असल्याची अनेक प्रकरणं यापूर्वी उघडकीस आली आहेत. मात्र, पुण्यातील भोसरीमध्ये चक्क एका महिलेने पोलीस असल्याचं बनाव रचत चक्क पोलीस ठाण्यातच गोंधळ घातला. या प्रकारामुळे भोसरी एमआयडीसी पोलीस स्थानकातील पोलीस देखील तिच्या बनवला बळी पडले. पण एका पोलीस अधिकाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे या महिलेचं बिंग फुटलं आणि तिचा खरा चेहरा समोर आला. हे सगळं करण्यामागचं महिलेनं सांगितलेले कारण ऐकून भोसरी एमआयडीसीमधील पोलीस देखील थक्क झाले. तोतया पोलीस बनलेल्या २७ वर्षीय महिलेचं नाव कविता प्रकाश दोडके असं आहे.

कविता दोडके ही सोमवारी संतोष पोटभरे नावाच्या एका २४ वर्षीय तरुणासोबत भोसरी एमआयडीसी पोलीस स्थानकात गेली. तिथे बाळू पोटभरे नावाच्या व्यक्तीची चौकशी कशाला करत आहात? मलाही कायदा कळतो” असं म्हणत कविताने गोंधळ घालायला सुरुवात केली. कविताने पोलीस असल्याचा इतका हुबेहूब पोलिसासारखा अभिनय केला की, काही वेळ तेथील पोलीसही तिच्या या नाटकामुळे गोंधळून गेले. मात्र, एका पोलीस अधिकाऱ्याने प्रसंगावधान दाखवत कविताला तिचा बक्कल नंबर विचारला. इथे मात्र कविता गोंधळली आणि अखेर तिचं बिंग उघड झालं.  

 

कविता बोगस पोलीस असल्याचं बिंग फुटल्यानंतर पोलिसांनी तिच्या चौकशी केली. तेव्हा खरा प्रकार उघडकीस आला. कविता आणि संतोष पोटभरे यांचे प्रेमसंबंध आहेत. संतोषचा भाऊ बाळू पोटभरे याच्यावर एका कार्यालयात तोडफोड केल्याचा आरोप आहे. बाळूचा शोध घेण्यासाठी एमआयडीसी पोलीस त्याच्या घरी पोहचले तेव्हा त्याचा भाऊ संतोष पोटभरे घरी होता. संतोषने याबाबत कविताला सांगितलं. आपण मुंबई पोलिसात असल्याचं बनाव रचत कवितानं पोलीस स्थानकात गोंधळ घातला. बक्कल नंबरची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी मुंबई कार्यालयात फोन करून कविता नावाची कोणी महिला पोलीस आहे का? अशी विचारणा केल्यानंतर ती तोतया पोलीस असल्याचं उघडकीस आलं. कवितासोबत प्रियकर संतोषवर पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या दोघांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती गुन्हे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी दिली.

Web Title: I am a policeman, I know the law too, the woman made a mess in the police station, finally ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.