मी आयपीएस अधिकारी बोलतोय...तरुणीची फसवणूक करणारा तोतया पोलीस अधिकारी निर्भया पथकाच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 02:37 PM2022-03-18T14:37:37+5:302022-03-18T14:45:29+5:30

Fake police Arrested : शहरातील मुलींनी अशा फसविणाऱ्या तरुणांपासून सावध रहा गरज पडल्यास निर्भया पथकाशी संपर्क साधा असे आवाहन पो कर्मचारी कुसुम क्षीरसागर यांनी केले आहे.

I am IPS officer talking... The fake police officer who cheated the girl is in the custody of Nirbhaya Pathak. | मी आयपीएस अधिकारी बोलतोय...तरुणीची फसवणूक करणारा तोतया पोलीस अधिकारी निर्भया पथकाच्या ताब्यात

मी आयपीएस अधिकारी बोलतोय...तरुणीची फसवणूक करणारा तोतया पोलीस अधिकारी निर्भया पथकाच्या ताब्यात

googlenewsNext

पंढरपूर : मी आयपीएस अधिकारी बोलतोय... माझा मुलगा पीएसआय आहे... तुमच्या मुलीला पाहण्यासाठी मी येणार आहे. त्याचबरोबर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते येणार आहेत. तुम्ही घरातील सर्व तयारी पूर्ण करून ठेवा असे संभाषण करून एका तरूण मुलीस व तिच्या आईला फसवणाऱ्या एका तोतया पोलीस अधिकाऱ्याला पंढरपूर निर्भया पथकाने ताब्यात घेतले आहे.

एक तरुणी पोलीस भर्तीची तयारी करत होते. यामुळे ती रोज एका ठिकाणी धावण्यासाठी जात होती. ही माहिती काढत या तरुणीस रमेश सुरेश भोसले-भिसे (वय २२, रा. यल्लामा मंदिराजवळ, आंबे, ता. पंढरपूर, जिल्हा सोलापूर) जाणून बुजून धावताना धक्का दिला. या नंतर तो तिच्याशी बोलू लागला. मी पीएसआय अधिकारी असू मी मंगळवेढा पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. तुम्हाला भरती साठी मदत करतो. त्याचबरोबर माझे वडील आयपीएस अधिकारी आहेत. आमच्याकडे पंचतारांकित हॉटेल्स, शेती जमीन जुमला आहे असे सांगू लागला. त्यांचीही तुम्हाला पोलिस भर्तीसाठी मदत होईल.
त्याकरणाने मुलीशी व तिच्या घरातील लोकांशी संपर्क वाढवला व वारंवार वेगवेगळया अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे सांगून मुलीला व तिच्या घरच्यांना लग्नासाठी तयार केले. त्यासाठी तो गेली सहामहीन्यापासुन पीडीत मुलगी व तिच्या आईच्या संपर्कात होता. 

एके दिवशी रमेशचा फोन लागत नसल्याने संबंधित मुलीने मंगळवेढा पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. यावेळी रमेश भोसले या नावाचा त्या ठिकाणी कोणीही अधिकारी कार्यरत नसल्याची माहिती त्यांना मिळाली.

यानंतर त्या मुलीने पंढरपूर निर्भया पथकाचे संपर्क साधला. उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, पोलिस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाने निर्भया पथक प्रमुख प्रशांत भागवत, सहा.पेालीस उपनिरीक्षक दत्तात्रय आसबे, पोलीस कर्मचारी प्रसाद औटी, निलेश कांबळे, अरबाज खाटीक, निता डोकडे, कुसुम क्षिरसागर, अविनाश रोडगे यांनी सापळा रचून रमेश भोसले याला पकडले. त्याला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अधिकाऱ्याचा गणवेश परिधान करायचा 

आपण खरोखरच पोलीस उपनिरीक्षक आहोत, हे भासविण्याठी पोलीस उपनिरीक्षक या पदाचा खाकी रंगाचा गणवेश, बेल्ट, कॅप, खेळण्यातील पिस्तोल इ. साहित्य सोलापूर येथून आणून पोलीस अधिकारी असल्याचे बनावट पोलीस ओळखपत्र व  बनावट आधारकार्ड देखील  तयार करुन घेवून त्याचा उपयोग रमेश भोसले याने मुलीची व तिचे घरातील लोकांची फसवणुक करण्यासाठी केला होता. तसेच तो  स्वतःचे वडील आयपीएस अधिकारी  म्हणून स्वतः फोन वरून मुलीच्या फोनवर फोन करत असल्याची माहिती निर्भया पथक प्रशांत भागवत यांनी सांगितली.

फसविणाऱ्या तरुणांपासून सावध रहा
आपली पंचतारांकित हॉटेल्स आहेत. अनेक मोक्याच्या ठिकाणी जमिनी आहेत.  जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, आयजी यांच्याशी खास ओळख आहेत. त्याचबरोबर पंचतारांकित हॉटेल जमिनी आहेत. अशी खोटी माहिती मुलीच्या आईला सांगून तुमच्या मुलीशी लग्न करून द्या म्हणून रमेशने तगादा लावला होता. परंतु त्याचे भिंग उघडे पडले. शहरातील मुलींनी अशा फसविणाऱ्या तरुणांपासून सावध रहा गरज पडल्यास निर्भया पथकाशी संपर्क साधा असे आवाहन पो कर्मचारी कुसुम क्षीरसागर यांनी केले आहे.

Web Title: I am IPS officer talking... The fake police officer who cheated the girl is in the custody of Nirbhaya Pathak.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.